पिंपळगाव हांडे येथील गहू शेताला आग
बार्शिटाकळी- बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव हांडे या गावात गव्हाच्या शेताला आग लागण्याची गंभीर घटना घडली. पिंपळगाव हांडे येथील शेतकरी पंजाबराव हांडे यांच्या गावालगत असलेल्या तीन एकर शेतामध्ये गव्हाचे पीक ऊभे होते. त्यापैकी काही गहू काढलेला आणि काही सोंगणीला आलेला गहू शेतामध्ये उभा होता. मंगळवार दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी भर उन्हात अचानक लाईनच्या खांबावरती शॉर्ट सर्किट होऊन खाली गोळे पडले. यामुळे गहू वाढलेला असल्याने लगेचच आगीचा भडका झाला. आणि पाहता पाहता पुर्ण शेतामध्ये आग पसरुन गेली.
हे दिसतात गावातीलअनेक शेतकरी आग विझवण्यासाठी धावले.परंतू नियंत्रणाबाहेर गेलेल्या या भयंकर आगीने काही मिनिटात शेतामधला गहू व थ्रेशर मधून काढलेले गव्हाची पोती सुद्धा जळून खाक झालीत. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे जवळपास ३५ क्विंटल गव्हाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विद्युत विभागाने व कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
Post Views: 24