जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून चोरीच्या ५ मोटरसायकल जप्त
अकोला- वाहतुक तपासणी पथकाने संशयावरून केलेल्या तपासणीत वेगवेगळ्या ठीकणाहून ५ मोटर सायकली़ची चोरी करणारा सापडला असून त्याच्याकडून ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
महिला पोलिस शिपाई उज्वला इटिवाले ह्या जठारपेठ चौक येथे वाहन तपासणी करीत असताना त्यांना एक वाहन संशयित वाटल्यावरून त्यांनी चालकाला थांबवून त्याची तपासणी केली. त्यात सदर वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सदर माहिती जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मा. विलास पाटील यांना दिली. त्यांनी तपासणी स्थळावरून ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना दिल्यावरून ते पण त्याठीकाणी पथकासह दाखल झाले.सदर प्रकरणी स्वप्निल भागवत अंबासकर रा.हरिहरपेठ,अकोला यास ताब्यात घेण्यात आले.त्याने आणखी चार वाहनांची चोरी केल्याची कबूली दिली. त्यातील २ शेगाव येथून,१ गाडगे नगर अमरावती येथून,१ सिव्हील लाईन पोलिस स्टेशन हद्दीतून, तर १ मोटरसायकल मुर्तिजापूर येथून चोरल्याची कबूली दिली.त्याच्याजवळून अंदाजे रू. ९५ हजाराच्या ५ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी शेगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या वाहतूक विभागाच्या पथकाने केली आहे.
Post Views: 10