लोकस्वातंत्र्यच्या देवेंद्र मेश्राम यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Nov 2023, 12:59 PM
   

पालघर : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पालघर जिल्हा पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र शिवचरण मेश्राम यांना भारतीय समाजोन्नती संघ आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार 2023 ने मुंबई सीएसएमटी येथील प्रेस क्लब हॉल येथे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमा ची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजात अनेक असे उल्लेखनीय कर करणारे सामाजिक,शैक्षणिक, आरोग्यविषयक कार्य करणाऱ्यांचा संस्थे मार्फत अंगवस्त्र, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे (मा.नगरपाल मुंबई) ,कार्यक्रम अध्यक्ष मा.भाऊ जगताप (ज्येष्ठ कामगार नेते) ,स्वागताध्यक्ष मा.संगीता ताई गुरव (समाजसेविका व उद्योजिका) , मा.वृषाली प्रवीण (मिस महाराष्ट्र 2020,अभिनेत्री व मॉडेल) , दीपक काळीगण (अध्यक्ष महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ) ,कार्यक्रम आयोजक मा.संतोष तांबे (अध्यक्ष भारतीय समाजोन्नती संघ) , मा.सूरज भोईर (संस्थापक सदस्य भारतीय समाजोन्नती संघ) या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी हा पुरस्कार वितरण सोहळा अतिशय आनंदात पार पडला.कार्यक्रमाच्या शेवटी सूरज भोईर यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे आभार मानले.

    Post Views:  261


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व