बि एस एन एल एससी एसटी पेन्शनर असोसिएशन सचिव सुनिल सोनवणे व वासुदेवराव शिरसाट पुरस्कारांनी सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Sep 2026, 8:10 AM
   

अकोला - बीएसएनएल पेन्शनर्स एससी एसटी असोसिएशन अकोला तर्फे श्री सुनील सोनवणे सचिव यांना जीवन गौरव पुरस्कार व अकोल्याचे सल्लागार श्री वासुदेवरावजी शिरसाठ यांना कार्यगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.संघटनेचे पहिले जिल्हास्तरीय व व्दितीय महाराष्ट्र सर्कल अधिवेशन स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा येथे नुकतेच संपन्न झाले.याप्रसंगी श्री शिवचरण डोंगरे,माझोड यांनी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.बहूसंख्य सभासद पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन उत्साहात पार पडले.
      या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्तविक श्री शिवचरण डोंगरे यांनी केले व श्री वासुदेव शिरसाट, सुनील सोनवणे,श्री काळबांडे श्री जेल खंडारे व इतर संघटनेचे आमंत्रित श्री विजय बांडी सर व लगड सर यांची भाषणे झाली. त्यानंतर एससी एसटी पेन्शनर असोसिएशन ची पदाधिकारी निवडणूक घेण्यात आली. प्रथम अकोला पेन्शनर एससी एसटीची निवडणूक पार पडली ती निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष श्री जनार्दन खंडारे व सचिवपदी श्री शिवचरण डोंगरे व सदस्य गण बिनविरोध निवडण्यात आले.त्यानंतर महाराष्ट्र परिमंडळ असोसिएशनची निवडणूक पार पडली.त्यामध्ये सुद्धा अध्यक्ष श्री बचाव सर व सचिव श्री पगारे सर व सदस्यांची बिन विरोध एकमताने निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया मोठ्या  विधायक व उत्साही वातावरणात पार पडली. सभासदांनी आपले कर्तव्य समजून मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.त्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी संचालन मधुकरराव भिसे यांनी केले. श्री प्रकाश शिरसाट वाशिम यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमांचा समारोप केला.

    Post Views:  7


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व