परमबिर सिंग व सचिन वाझेचे आरोप बिनबुडाचे, हाय कोर्टाच्या निरीक्षणानुसार तथ्यहीन आरोप ed व cbi केस मध्ये हाय कोर्टाचे निरीक्षण


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  07 Feb 2023, 7:12 PM
   

माननिय मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणात व त्यानंतर लगेच मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याच्या प्रकरणानंतर अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांची खालच्या पदावर बदली करुन त्यांना निलंबीत केले. तसेच फौजदार सचिन वाझेला सुध्दा निलंबीत करुन त्याला सरकारी नोकरीतुन काढुन टाकले आणि म्हणुन परमबिर सिंग व सचिन वाझे यांनी एकत्रीत येऊन सुडबुध्दीने अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केले.
1) विशेष बाब म्हणजे ed च्या केस मध्ये हाय कोर्टाने जामिनाच्या आदेशात ed च्या या आरोपांत काहीही तथ्य नसल्याच निरीक्षण नोंदविले होते. याच प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या खंडपिठाने ते निरीक्षण कायम ठेवत, हे आरोप बिनबुडाचे असल्याचं मान्य केल.
2) ed व cbi यांनी जोमाने दिड वर्षे तपास करुनही 130 हुन अधिक धाडी व 250 जणांची चौकशी करुन सुध्दा पुराव्याअभावी अनिल देशमुख या कथीत प्रकरणात दोषी नसल्याचे स्पष्टपणे दिसुन आले.
3) परमबिर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा आरोप केला होता. पण 18 महिन्याच्या चौकशी नंतर अनिल देशमुखांच्या विरोधात ed ने कोर्टामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात तिच रक्कम फक्त 1.71 कोटीवर आले व त्याचेसुद्धा पुरावे तपासयंत्रणा सादर करू शकल्या नाहीत.
4) ed व cbi गुन्हातील हाय कोर्टाच्या जामीन आदेशात असे नमुद केले आहे की, या प्रकरणात कोणतेही पुष्टीदायक पुरावे नाही. परमबिर सिंग आणि सचिन वाझे यांनी केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित आहेत. सचिन वाझे हा विश्वावार्ह साक्षीदार नाही. तो अनेक गंभीर गुन्हातील आरोपी आहे. ed आणि cbi जामीन आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, हे संपुर्ण प्रकरण सचिन वाझेच्या आरोपावर आधारित आहे.
5) cbi गुन्हातील जामीन आदेश (परिच्छेद 17 cbi जामीन आदेश ) असे नमुद करण्यात आले आहे की, सचिन वाझे हा एक गुन्हेगारी स्वरुपाचा व वरील गुन्हातील सहआरोपी होता. ज्याला आता माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. त्याची पोलिस अधिकारी म्हणुन कारकिर्द वादग्रस्त होती. (परिच्छेद 75 ed जामीन आदेश ) तो 16 वर्षे सेवेतून निलंबीत होता. आतापर्यत त्याला दोन खुनासारख्या गंभीर आरोपात अटक झाली आहे. तसेच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्याचा प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा nia ने दाखल केला आहे. त्याच्यावर फेक एन्काउंटर, वसुली असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. (परिच्छेद 18 cbi जामीन आदेश )
6) A) न्या. चांदीवाल यांच्या आयोगासमोर सुध्दा परमबिर सिंग यांनी दिलेल्या शपथपत्रात अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव (here say) माहितीच्या आधारे केले आहे व माझ्याकडे त्याचा काही पुरावा नाही असे नमुद केले आहे. तसेच सचिन वाझे याने सुध्दा न्या. चांदीवाल यांच्या समोर मला अनिल देशमुख यांनी बार मालकाकडुन कधीच पैसे गोळा करावयास सांगीतले नाही किंवा पैसे मागीतले नाही असे शपथेवर सांगीतले आहे.
7) अनेक बार मालकांनी सचिन वाझे याला पैसे दिले. या बार मालकांनी 164 अंतर्गत न्यायाधीशांच्या समोर दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, त्यांनी पैसे नंबर वन साठी दिले. ते नंबर वन तत्कालीन आयुक्त परमविर सिंगच होते. तसेच या केसमधील स्वतंत्र साक्षीदार Acp संजय पाटील यांनी 164 अंतर्गत न्यायाधीशांच्या समोर दिलेल्या आपल्या जबाबात असे सांगीतले आहे की, सचिन वाझे हा बार मालकाकडुन पैसे जमा करायचा व हे पैसे तो नंबर 1 म्हणजे परमबिर सिंग यांच्यासाठीच जमा करायचा (परिच्छेद 59 व 60 ed जामीन आदेश )
8) रणजीत सिंग शर्मा प्रकरणाचा दाखला देत कोर्टाने ed गुन्हातील जामीन देतांना असे म्हटले आहे की, अनिल देशमुख यांची या गुन्हातुन निर्दोष मुक्तता होवू शकते. ( परिच्छेद 76 ed जामीन आदेश )
9) वरील सर्व बाबी लक्षात घेता केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे अनिल देशमुख यांना दोषी ठरवणे शक्य होणार नाही तसेच अनिल देशमुख यांची 30 वर्षाहून अधिकच्या काळात एकही गुन्हा नसणारी राजकीय कारकीर्द नेहमी स्वच्छ प्रतिमेची आहे, असे कोर्टाचे निरीक्षण आहे.

    Post Views:  302


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व