मानवी हक्क अभियान व विविध संघटनांकडून‌ गायरान जमिनी हक्क व विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-08-23
   

(एन. जी. सुर्यवंशी) देगलूर -  मानवी हक्क अभियान,वंचित हक्क आंदोलन व न्ड वादक कलावंत संघटना देगलूर यांच्या वतीने गायरान जमिनी नावे करण्यात याव्यात व इतर विविध मागण्यांसाठी  उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला.यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात  येणारे विविध मागण्यांचे निवेदन देगलूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.या निवेदनावर  मानवी हक्क अभियान चे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले,वंचित हक्क आंदोलनाचे नागनाथ चव्हाण,सखाराम बाऱ्हाळीकर,दिगंबर गायकवाड,शांताबाई येवतीकर,तुकाराम बाऱ्हाळीकर, दिगंबर विभूते,अंतेश्वर घाटे,गंगाधर भुयारे,नामदेव गवलवाड,संघमित्रा गवळे,संगीता सगरोळीकर या उपस्थित नेत्यांसह सह अनेकांच्या सह्या आहेत.
      दिलेल्या या निवेदनातून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे गायरान जमिनी नावे करून ७/१२ द्यावेत,वाहितीखालील गायरान जमिनीवरील सौर उर्जेचे सुरू असलेले काम थांबविण्यात यावे,जलवायू परिवर्तन मुलभूत हक्कात समाविष्ट करण्यात यावे,वनजमिनीसंदर्भात वनखात्याकडून सुरू असलेले अत्त्याचार थांबवावेत, दलित बजेट कायदा मंजूर करावा,बॅन्ड वादक कलाकार कामगारांना बांधकाम कामगारांप्रमाणे सवलती व योजनांचे लाभ द्यावेत व रू ५००० पेन्शन द्यावी,सरकारी गायरानावर बांधलेल्या घरांचे अतिक्रमण नियमित करावे, रमाई व इतर आवास योजनूत रू.१० लाख अनुदान द्यावे,मागासवर्गीयांसाठी शासनाकडून वस्ती वाढ करण्यात यावी,इतर अनेक योजना,सवलती,व विविध प्रमाणपत्रांचे  वितरण करण्यात यावे अशा विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी देगलूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रतिलीपी संबंधित सर्व मंत्री,सचिव आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.
       या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करून अन्याग्रस्तांना सहकार्य करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर येथे नेण्यात आलेया या मोर्च्यामध्ये अन्यायग्रस्त असंख्य ग्रामस्थांची लक्षणिय उपस्थिती होती.

    Post Views:  38


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व