प्रा. डॉ जयश्री पद्मराव देशमुख यांना - राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनाद्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठान कला संस्कृती आणी साहित्य संस्थे तर्फे उत्कृष्ट प्राध्यापक पदवीचा बहुमान प्राप्त
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Sep 2026, 10:23 AM
श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे कार्यरत असलेल्या प्राचार्य म्हणुन त्याच महाविद्यालयात अठरा वर्षाचा अनुभव असलेल्या आणि सध्या स्थितीमध्ये रामराव सरनाईक येथे अध्यापक म्हणून रुजू असलेल्या अकोल्यातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर जयश्री देशमुख यांना पंचरत्न सभागृह संगमवाडी पुणे येथे झालेल्या प्रतिष्ठान कला आणि संस्कृतीतर्फे आयोजित वर्ग कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला
प्राध्यापक डाॅ. जयश्री देशमुख यांनी बीएससी, बी.एड ,एम. एड, एम एस डब्ल्यू, आणि समाजकार्य विषयातील " पश्चीम विदर्भातील मथूरा बंजारा समाजातील नायकांच्या भूमिकेचे विश्लेषणात्मक अध्ययन " या विषयावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून विद्यावाचस्पती (ph. D) पदवी मिळविली आहे, त्यांनी विविध विषयांवर संशोधन केलेले असून अध्ययन व अध्यापन क्षेत्रात जवळपास त्यांचा एकतीस वर्षाचा अनूभव आहे त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये शतकाच्या वर विविध विषयांवर लेख प्रकाशित होऊन त्यांना भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे अनेक परिषदांमधील त्यांचा सहभाग हा उल्लेखनीय राहिलेला असून त्यांनी प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांना भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे व त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून त्यांच्या कार्याची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे अशी प्रतिक्रिया त्यांना परिचित आणि आप्तेष्ट व्यक्त करत आहेत
प्राध्यापक डाॅ. जयश्री देशमुख यांनी या पुरस्काराचे श्रेय श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम चे संस्थापक स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक व स्वर्गीय मालतीबाई सरनाईक आईजी तसेच शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक व सर्व सरनाईक परीवार तसेच वडील कैलासवाशी एडवोकेट पदमराव गणेशराव देशमुख,पती एडवोकेट कृष्णराव देशमुख, भाऊ एडवोकेट राजेश जाधव आणि भाव सासरे लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांना दिले आहे या सर्वांच्या आणि सासरच्या तसेच माहेरच्या नातेवाईकांच्या प्रोत्साहनामुळेच हा पुरस्कार आपण प्राप्त करू शकली अशी सद्भभावना व्यक्त केली आहे
Post Views: 6