अकोला जि. प. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांची सभा संपन्न
सेवानिवृत्तांसह कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या नियामोचित पद्धतीने तातडीने निकाली काढू : सि. ई. ओ. अन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Oct 2025, 10:36 AM
अकोला : जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह इतरही कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. काही समस्या दिवाळीपूर्वीच मार्गी लावून कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न करू असे भरीव आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेसह इतरही सर्व संवर्गाच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण सभा जि. प. च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात संपन्न झाली. त्यात विविध समस्या व मागण्यांचा आढावा घेताना त्यांनी ज्या समस्या जिल्हा परिषद स्तरावर नियामोचित पद्धतीने सोडविता येतील त्या तात्काळ निकाली काढू. तसेच राज्य शासनाच्या १५० दिवसांचा कृती कार्यक्रम यामध्ये प्राधान्याने आस्थापनाविषयक बाबीचा समावेश असल्याने आपण सर्व कर्मचारी यांनी त्यात सहभागी होऊन अकोला जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर येण्याकरिता सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा कर्मचारी संघटनेकडून व्यक्त केली. या सभेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मायाताई शिर्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांचे सह इतरही विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप खाडे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी सर्व संघटने करिता एक सामायिक अभ्यागतं कक्ष उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या संघटनेच्या सर्व मागण्या सभेत नमूद करून त्यावर विवेचन केले.या सभेत प्रारंभि सेवानिवृत्त कर्मचारी संघाने आपल्या समस्या मांडल्या. त्यात प्रामुख्याने आरोग्य विभागातील आश्वासित प्रगती योजनेचा पहिला, दुसरा व तिसरा लाभ मंजूर करणे, जलसंधारण विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंत्यांच्या आश्वासित योजनांचे प्रस्ताव निकाली काढणे, आरोग्य विभागातील त्रुटी समिती नुसार सुधारित वेतनश्रेणी, निवृत्त शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव, बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता यांचे प्रस्ताव, पतसंस्थेची मोघम वसुली थांबविणे आदी मागण्यांचा समावेश होता.
विविध शिक्षक संघटनांच्या वतीने पदोन्नती, निवड श्रेणी, विषय शिक्षक पदोन्नती, विषय शिक्षक पदावनती, अधिसंख्य शिक्षकांचे वेतन, 2005 पूर्वीच्या जाहिरातीनंतरच्या शिक्षकांची वेतनश्रेणी, दिव्यांग शिक्षकांना पदोन्नती, उर्दू शिक्षकांचे विविध प्रश्न, विस्थापित शिक्षकांची पदस्थापना, समायोजन यासह इतरही मागण्या सविस्तरपणे मांडण्यात आल्यात. सभेत सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष प्रदीप खाडे, प्रेम कुमार खत्री, कोषाध्यक्ष अशोक मांगुळकर, म. रा. जि. प. कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस सुनील जानोरकर, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी संघर्ष सावरकर, ज्ञानेश्वर मांडेकर, ग्रामसेवक संघटनेचे रवी बाबू काटे, उर्दू शिक्षक संघटनेचे जव्वाद हुसेन सर, प्रशांत शेवतकर, मोहन तराळे, प्रवीण गायकवाड, विलास मोरे, शाहिद इकबाल, ओम प्रकाश देशमुख, संजय घोडे, महेंद्र भगत, मंगेश पाथरीकर, परमानंद धोटे, दिव्यांग संघटनेचे दिलीप सरदार, मोहम्मद अजीज अ. रशीद, अजय बांडी, विजय वाकोडे, पुंडलिकराव भोंडने, दिगंबर मालगे, गिरीश मोगरे, ज्ञानेश्वर पटोकार, प्रशांत शेवतकर, कक्ष अधिकारी अभिजीत बन्नोरे, प्रशांत पिंजरकर, पंकज बिरुले, स्मिता नालींदे, भारती देशमुख, महादेव शिंदे, एस डब्ल्यू ठाकरे, राजेश बहिर्डे, राहुल गोप नारायण, श्याम इंगळे, जीवन देवकते, रामराव राठोड, माधुरी देठेआदी उपस्थित होते सदर बैठक सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित केली होती.या करिता भारती देशमुख धनंजय म्हसणे नालिंदे मॅडम कुलाल आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Post Views: 176