देशमुख समाजाचा 24 डिसेंबरला राज्यसतरीय वधू-वर परिचय मेळावा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Dec 2023, 11:37 AM
अकोला - अकोला जिल्हा देशमुख समाज जागृती मंडळ या नोंदणीकृत अधिकृत मंडळांच्या वतीने 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता राज्यस्तरीय वधू-वर परिचय व समाजबांधव स्नेहमिलन मेळावा देशमुख समाज मंगल कार्यालय, डाबकी रोड, कॅनॉल मार्ग अकोला येथे संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी करून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि सभासद संघटीत प्रयत्न करीत आहेत. देशमुख समाजाचा ह्या कार्यक्रम वेळी 2000 हजारांच्या वर समाजबांधवांची उपस्थिती असणार, असा मनोदय आयोजकांनी व्यक्त केला आहे.
अकोला जिल्हा देशमुख समाज जागृती मंडळाच्या युवा पदाधिकार्यांच्या अचूक नियोजनातून वार्षिक दिनदर्शिका आणि शुभमंगलम् वधू-वर मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशनासाठी तयार आहे. यावर्षी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. वधू-वरांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. स्वागत गीत, स्वागत समारंभ आणि मान्यवरांची मार्गदर्शने तथा समाजातील नामवंत व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराचे वितरण, या सर्व कार्यक्रमानंतर उपस्थित समाजबांधवांसाठी या राज्यस्तरीय मेळाव्यात स्नेहभोजनाचा कार्यक्रम अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. या समारोहात येणार्यांची नोंदणी व शुभमंगलम् पुस्तकाचे वितरण यावेळी केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्कसाधण्याचे आवाहन देशमुख जागृती मंडळाच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
Connection failed: Operation not permitted