सांगोला येथे परिवर्तन विचारधारा काव्य संमेलन संपन्न


 संजय देशमुख  2022-08-22
   


सांगोला (अनिता देशमुख): भावमेघ, भावानुबंध महिला समूह, दिनविशेष स्पर्धा समूह, परिवर्तन विचारधारा राज्यस्तरीय समूहाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त काव्य संमेलन दिनांक 31 जुलै रोजी सांगोला जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते.


  कार्यक्रमाची सुरुवात संविधान ग्रंथदिंडीने करण्यात आली. 
 सदर कार्यक्रमाचे आयोजन समूह प्रशासिका कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा सौ. अनिता देशमुख कल्याण यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड डोंबिवली प्रमुख पाहुणे माजी कमिशनर ज्येष्ठ साहित्यिक गझलकार रमेश सरकाटे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कसबेकर पुणे स्वागताध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर अरुण अहिरराव ,कार्यक्रमाचे, कार्याध्यक्ष दिलीप डोहळे ,मार्गदर्शक लीलाताई पुजारी डोहळे, गझलकार सिराज शिकलकर ,गझलकार कवी डॉक्टर लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा प्राध्यापक विजय माने सांगोला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    संमेलनासाठी महाराष्ट्रातील नागपूर ,चंद्रपूर, कोल्हापूर, कल्याण,डोंबिवली, अंबरनाथ ,पनवेल, मुंबई, नवी मुंबई पुणे ,मंगळवेढा ,कर्जत,, कसारा,सांगोला , जळगाव, नांदेड, वर्धा ,यवतमाळ इत्यादी इत्यादी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले कवी उपस्थित होते. विविध भागातील कवी कवयित्री स्थानिक गझलकार सहभागी होते जवळजवळ 55 जण उपस्थित होते.
 सर्वांनी आपल्या भरदार रचना सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.
  गझल मुशायऱ्याचे कार्यक्रमाने संमेलनाला अहिल्याबाई होळकर सभागृहात चार चांद लावले .
  38 कवींनी आपल्या रचना आणि जवळपास 18 गजलकारांनी आपल्या बहरदार गजला सादर केल्या, मुशायरा आणि उत्स्फूर्त शेरोशायरी ,गीते संपूच नये , असे वाटत होते. असे असतानाच घड्याळाचा काटा सरकणारा थांबावा असे वाटत होते.
   अनेक मान्यवरांच्या त्यांच्या साहित्यिक ,सामाजिक कर्तव्याची दखल घेऊन शाल, सन्मानपत्र ,गुलाब पुष्प ,ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. 
    यामध्ये माननीय सिराज शिकलगार यांना त्यांच्या गझलगंध या संग्रहासाठी काव्य पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा यांना पाऊलवाट काव्यसंग्रहाल पुरस्कार देण्यात आला सिद्धेश उतेकर,प्रदीप बडदे मकरंद पाटील यांना सामाजिक तसेच काव्य पुरस्कार देण्यात आला. तसेच 
     समूहाच्या मार्गदर्शिका लीलाताई पुजारी डोहळे,दिलीप डोहळे यांना प्राध्यापक उत्कृष्ट शिक्षक आणि मार्गदर्शक, परीक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला.    
      समूहामध्ये विविध उपक्रम राबवणे यासाठी छाया पायमोडे यांना पुरस्कार देण्यात आला.
   सिद्धनाथ बनसोडे ,प्रदीप बडदे,, गझलकार जयराम घोंगडे यांना निबंध स्पर्धेत क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला .
  कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजिका सौ अनिता देशमुख, प्रदीप बडदे ,सिद्धेश उतेकर, मकरंद पाटील, आप्पासाहेब कसबेकर डॉक्टर ,प्राचार्य अरुण अहिरराव ,सिद्धनाथ बनसोडे ,गझलकार दुष्यंतकुमार ,गझलकार अक्षय कुमार यवतमाळ यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रमास यशस्वी केले स्थानिक सभागृहातील कार्यकारी सदस्यांचा सहभाग नियोजनाला हातभार आणि मदत लाभली.
    आभाराचे गोड कार्य श्री दिलीप डोहोळे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
टीप--- सौ अनिता ताईने जेवण आणि नाश्त्याची मेजवानी आणि सर्वांची राहण्याची व्यवस्था ठेवलेली भरदस्त नियोजन ,
रुचकर लाजवाब जेवण आणि नाष्टा यांची मेजवानी फार प्रशंसनीय आहे.
   अनिता देशमुख यांना उत्कृष्ट, निर्भीड ,तडफदार व्यक्तिमत्व,उत्कृष्ट समूह संचालक आणि उत्कृष्ट        
कवियत्री,तसेच सामाजिक ,तसेच अनिस चे समाजप्रबोधन म्हणून विशेष पुरस्कार पोलीस प्रशासक अप्पासाहेब कसबे कर, स्वागताध्यक्ष डॉक्टर अरुण अहिरराव,शुक्राचार्य गायकवाड यांनी सर्वांच्या वतीने प्रदान केला.

    Post Views:  231


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व