सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका सुरू नाहीत. मात्र जिल्ह्यातील राजकीय वातावरण चागंलेच तापलेलेलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभांचा सपाटा लावलाय. यामध्ये विरोधकांवर टीकेची झोड उडवत आहेत. तर स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतलं आहे. गद्दारी केलात तर मी सहन करणार नाही असा इशारा केंदीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. राणेंच्या या वक्तव्याचा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी समाचार घेतलाय. गद्दारीतून जन्म झालेल्या राणेंनी गद्दारी बद्दल बोलू नये, मुलांसाठी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना राणे धमक्या देतायेत मात्र कार्यकर्त्यांनी घाबरू नये, असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं आहे.
गद्दारी केलात तर मी सहन करणार नाही. माझ्याकडे गद्दारी चालत नाही. पद मागा मी देईन पण गद्दारी सहन करणार नाही. गद्दारी करून आपल्याच लोकांना पाडणार असाल तर चालणार नाही, असा सज्जड दम सावंतवाडी येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना दिला. राणेंच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून गद्दारी करणाऱ्यानी गद्दारी करू नये असा खोचक टोला जॉईंटकिलर वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आमदार वैभव नाईक यांनी निशाणा साधला आहे. स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणेंनी सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही, बघून घेईन, अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. मात्र नारायण राणेंनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना लगावला आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेबरोबर गद्दारी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले. आपल्या दोन्ही मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत. मात्र जिह्यातील येणाऱ्या निवडणुकीत जनता व कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत हे स्पष्ट होईल, असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं आहे.
Post Views: 206
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay