या कार्यक्रमात स्वरांजली संगीत विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थीनीने भक्ती नादात गाईलेले दादा मला एक गणपती आण हे गाणे विशेष आकर्षण ठरले. याबद्दल प्रा.वक्ते यांनी तिचे रोख बक्षिस देऊन कौतुक केले. यावेळी बारीवर सुमधूर स्वर छेडून राजू जोशी यांनी रंगत वाढविली. तबला प्रशांत इंगळे यांनी तर पाडवर मनिष हुदेकर यांनी केली. ऑर्गनसाठी नवोदीत विद्यार्थी कलावंत गौरव महाजन याची साथ लाभली. या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सुत्रसंचलन डॉ.प्रविण देशमुख यांनी केले, तर श्री प्रकाश पाठक यांनी मंजिरीवर साथ दिली. चिंतामणी गणेश मंदिराच्या वतीने दर महिण्याला अशा कार्यक्रमाचे आयोजन असते. या कार्यक्रमाचाही रसिकांनी आस्वाद घेऊन आनंद व्यक्त केला.Post Views: 404
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay