महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता महिला मेळावा काळाची गरज _ स्नेहल तराळे


  विश्वप्रभात  06 Apr 2026, 11:52 AM
   

अकोला - मराठा पाटील समाजातील महिलांमध्ये उच्चतम टॅलेंट आहे. महिलांनी उद्योगात सुद्धा चांगले यश संपादन केले आहे त्याची अनेक उदाहरणे आहेत. मराठा पाटील समाजातील महिलांनी धाडस करून उद्योगधंदे व्यवसाय उभारणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात घरातील एका व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून राहणे कठीण होणार असून आता महिलांनी छोटे-मोठे उद्योग करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन यशस्वी व्यावसायिका स्नेहश्री फॅशन हबच्या संचालिका स्नेहल तराळे यांनी केले महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता महिला मेळावे होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुढे बोलताना  स्नेहल कराळे यांनी केले. त्या मराठा पाटील संघ बाळापूर वतीने आयोजित मराठा पाटील संघटनेच्या कौटुंबिक महिला मेळाव्यात बोलत होत्या.  कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती कुसुमताई किसनराव राऊत, जयश्री बाळासाहेब ताथोड उपस्थित होत्या.
    छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यतिथी निमित्त छत्रपती राजे शिवाजी व राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेस मांल्या अर्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रेखा राऊत, मालूताई पोहरे, मीनाक्षी नकासकर, सीमा वानखडे कांचन साबळे ममता इंगोले, कोकिळा माळी, ज्योती टाले,
 दिपाली मुरूमकर उपस्थित होत्या
     प्राध्यापक दिपाली घोगरे यांच्या बहारदार संचलन कार्यक्रमात  महिलांच्या विविध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रज्ञावंत महिलांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच फॅशन शो, खेळ पैठणीचा आदी कार्यक्रम  विविध क्षेत्रांच्या माध्यमातून घेण्यात आले खेळ पैठणीचा यामधील पैठण्या गुरुदेव ड्रेसचे संचालक मोहन सराफ यांच्या सौजन्याने देण्यात आल्या. याप्रसंगी मिस पाटील बाळापूर, मिसेस पाटील बाळापूर यांची निवड विविध स्पर्धांच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी स्नेहल तराळे परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदना करून करण्यात आली. याप्रसंगी सीमा वानखडे,गायत्री वानखडे,मीनाक्षी वानखडे,मालू ताई पोहरे,मोनिका लांडे,उज्वला बढे,कोकिळा माळी, मीनाक्षी नकासकर,दीपाली घोगरे,सुचिता घोगरे,मेघा घोगरे,स्नेहल तराळे,गौरी काळे,पूजा काळे,रुपाली ठाकरे,ज्ञानेश्वरी माळी, प्रीती तायडे,उमा तायडे,गोकुळा तायडे,आशा तायडे,दीपाली मुरूमकार,उमा दांदळे,अशिका मुरूमकार,जान्हवी दांदळे,खुशी दांदळे,ज्योती ताले,प्रतिभा पाथ्रीकर,डॉ ममता इंगोले,विभा पाथरकर, अश्विनी काळे,जयश्री घोगरे,स्वाती माळी, योगिता लताड,संगीता माळी, सीमा निर्मळ, दीपाली पारसकर,सुनीता वानखडे,श्रद्धा खेळकर, रूपाली लांडे, रितिका लांडे विद्या साबळे मीना साबळे कु श्रद्धा साबळे  सौ उषा योगेश भटकर सौ रूपाली विवेक सरप सौ नेहा सचिन सरप 
सौ वैष्णवी सागर मानकर 
सौ मीराबाई जनार्दन गावंडे
सौ वर्षा संतोष सरप
सौ दिपाली शुभम मानकर
आदी महिलांसह बाळापुर तालुक्यातील प्रचंड संख्येने महिला उपस्थितीत होत्या.

    Post Views:  119


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व