श्री. सुरेश फकिरराव तांबोळी सर यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Sep 2026, 8:52 AM
   

महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, परभणी येथे तब्बल एकोणतीस वर्षे प्रदीर्घ काळ शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणारे आदरणीय श्री. सुरेश फकिरराव तांबोळी सर हे नियत वयोमानानुसार आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनिमित्त सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
माननीय श्री. अजयरावजी गव्हाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. लखनसिंह जाधव सर होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य श्री. तुळशीराम वानरे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. कैलासराव लोनसने सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दादासाहेब मेश्राम सर, गुरुवर्य श्री. विलासरावजी चट्टे पाटील मिर्झापूरकर सर, सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री. रमेशराव नाईकवाडे सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते श्री. तांबोळी सरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजीराव वीरसे यांनी केले. प्रास्ताविक श्री. राजेंद्र गहाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एन. के. चापके यांनी केले.
श्री. तांबोळी सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी महात्मा फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाखा भीमनगरचे सुपरवायझर श्री. राजेंद्र गहाळ, मढी शाखेचे श्री. सोनाजी खनपटे, जिंतूर रोड शाखेचे श्री. अंकुशराव मोगरे, गणेश नगर शाखेचे श्री. शिवाजीराव वीरसे तसेच विविध शाखांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने व प्रयत्नातून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सत्काराला उत्तर देताना भावुक झाले तांबोळी सर
सत्काराला उत्तर देताना श्री. सुरेश फकिरराव तांबोळी सर यांनी आपल्या २९ वर्षांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री. विजयरावजी गव्हाणे साहेब यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच आपल्या आयुष्यात मोलाचे योगदान देणारे श्री. स्वराज्यसिंह परिहार, आपले मोठे बंधू व वडील यांच्याप्रतीही त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
सेवापूर्ती कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्राचार्य श्री. लखनसिंह जाधव, श्री. प्रदीप चव्हाण व श्री. एन. के. चापके यांचे त्यांनी विशेष आभार मानले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात साथ, सहकार्य आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानताना श्री. तांबोळी सर भावुक झाले आणि त्यांनी आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या.
या प्रसंगी श्री. तांबोळी सरांचे सर्व नातेवाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेला मनःपूर्वक सलाम!
आदरणीय श्री. सुरेश फकिरराव तांबोळी सर यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
— महात्मा फुले विद्यालय परिवार, परभणी

    Post Views:  13


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व