लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या 6 पदाधिकार्यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे आणि सहकार्यांचे आयोजन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
28 Oct 2022, 7:40 PM
अकोला : पुण्यात मणिभाई मानवसेचा ट्रस्टच्या उपक्रमात अकोल्यातून संजय देशमुख, प्रा. डॉ. संतोष हुशे व पुष्पराज गावंडे तर सातारा येथुन बाळासाहेब आंबेकर या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संजय एम. देशमुख, बाळासाहेब आंबेकर, प्रा. डॉ. संतोष हुशे व पुष्पराज गावंडे व अन्य मान्यवर अतिथींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
केंद्र सरकारच्या निती आयोगाशी संलग्न मणिभाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने यावर्षी देण्यात येणार्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्काराचे वितरण पुण्यामध्ये 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांचेसह सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार, कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर तथा शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. डॉ. संतोष हुशे, वर्धा येथील किशोर मुटे, पत्रकार-कवी संदीप देशमुख व व्यंगचित्रकार शुभम बांगडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्याचे उच्चशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या कार्यक्रमात पुण्याचे आमदार महेश लांडगे, भिमराव अण्णा तापकीर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पुणे स्टेशन जवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात दि. 31 ऑक्टोबर रोजी सायं. 5.30 वाजता मणिभाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक पदाधिकारी प्रबोधनकार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविन्द्र भोळे आणि त्यांच्या सहकार्यांनी या समारंभाचे आयोजन केलेले आहे. या ट्रस्टच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या नामवंतांचा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यावर्षी यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकार्यांनाही त्यांच्या उल्लेखनीय वाटचालीबाबत पुरस्कारीत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जास्तत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक, प्रबोधनकार डॉ. रविन्द्र भोळे यांनी केले आहे.
Post Views: 150