महाराष्ट्र कामगार कल्याण अंधेरी मुंबईत स्वतंत्र दिन उत्सवात साजरा
मुंबई प्रतिनिधी--- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अधिकारी अंतर्गत बिट अधिकारी कार्यालय गोंदवले गावठाण,अंधेरी येथे 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माननीय श्री भरत हरिबा सकपाळ व पोलीस निरीक्षक सतीश कावणकर आणि शुभम गोडसे पोलीस उपनिरीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हा समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे भरत सकपाळ ठाणे जिल्हाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या हुतात्मांच्या अहुतीला अनुसरून कार्य करावे.नेताजी सुभाष चंद्र बोस भगतसिंग राजगुरू,चाफेकर बंधू असे अनेक क्रांतिकारकांनी स्वतंत्र्यासाठी बलिदान दिले त्याचा विसर पडता कामा नये,असे मत व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक सतीश कावणकर यांनी स्वतंत्र दिनानिमित्त शाळेतील लहान मुलांना मार्गदर्शन केले.आपल्या वर्तनातून देश बलशाली करण्यासाठी प्रयत्न करूज्ञया असे आव्हान केले.अध्यक्ष व्यसनमुक्ती केंद्र अजय कोरुगडे यांनी स्वतंत्र टिकून ठेवण्याच्या अनुषंगाने सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड ,पोलीस निरीक्षक संतोष धाडवे ,पोलीस उपनिरीक्षक केतन खैरे , सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोलीस हवालदार सुमित साळवी, पोलीस हवालदार केतन देव, पोलीस हवालदार विघ्नेश तळेकर, पोलिस कोंडीबा पुंगळे, पोलीस शिपाई शंकर चव्हाण, अमोल हुलगे, दिलीप हिक्के, संदीप दाते असे अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून ध्वजला सलामी देण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्वांचे वतीने वंदे मातरम् राष्ट्रगीत गायनात आले यावेळी उपस्थित सारे सामाजिक कार्यकर्ते कादिर नाझीर शेख तसेच कामगार कल्याण अधिकारी माननीय सयाजी पाटील साहेब यांच्या हस्ते मान्यवर पाहुणे तसेच उपस्थित ना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाची निवेदन आभार प्रदर्शन सहाय्यक बीट अधिकारी सौ सायली नाईक यांनी केले तसेच अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 1