एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार गणवेशाचा कापड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Jun 2024, 7:36 AM
   

गेली सहा वर्षे एसटी महामंडळाच्या वाहक, चालकांना स्वतः पदरमोड करून गणवेश शिवावा लागला होता. यावेळीही शिलाई देण्यास महामंडळ प्रशासनाने टाळाटाळ केल्याची माहिती आहे. महामंडळाकडून चालक-वाहकांना गणवेशाचा कापड मिळणार आहे. अकोला व वाशिम विभागातील एक हजार ५०३ चालक-वाहकांना गणवेशाचा कापड मिळणार आहे.

एसटी महामंडळात काम करणाऱ्या वाहक आणि चालकांना महामंडळ प्रशासनाकडून गणवेश तसेच शिलाई खर्च दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत महामंडळाने चालक व वाहकांना गणवेश दिला नाही. त्यामुळे पगारातूनच कर्मचाऱ्यांना गणवेशाचा खर्च करावा लागत होता.

यंदा महामंडळ प्रशासनाने चालक व वाहकांना गणवेशाचा कापड देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना गणवेश मिळणार आहे. मात्र, शिलाईचा खर्च स्वत: करावा लागणार असल्याने महामंडळाच्या या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमधून प्रतिक्रिया येत आहेत.

शिलाईचा खर्च स्वतः करावा लागणार

एसटी महामंडळातील वाहक-चालकांना गणवेशासाठी कापड आणि शिलाई भक्ता दिला जात होता. यावेळी मात्र केवळ गणवेशाचे कापड महामंडळ प्रशासनाकडून पुरविले जाणार आहे. शिलाईंचा खर्च वाहकांना स्वतःच्या खर्चातून करावा लागेल. महामंडळ प्रशासनाने शिलाई भत्ता देखील द्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होत आहे.

सहा वर्षांपासून एसटी महामंडळातील वाहक-चालकांना गणवेश दिला जात नाही. या काळात वाहक आणि चालकांनी स्वतः कपडे खोदी करून गणवेश शिवून घेतले. आतापर्यंत गणवेशावर वाहक, चालक यांनी केलेला खर्च एसटी महामंडळ प्रशासनाने द्यावा. तसेच यावेळी केवळ कापड पुरविले जात आहे. पण शिलाई भत्ताही मंजूर करावा, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

एसटी महामंडळ प्रशासनाकडून वाहक-चालकांना गणवेशाचा कापड दिला जाणार आहे. शिलाईचा खर्च कर्मचाऱ्यांना करावा लागणार आहे. अकोला व वाशिम विभागातील १५०३ चालक-वाहकांना गणवेशाचा कापड मिळणार आहे.

    Post Views:  58


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख