स्व. गोविंद मोरे यांचे स्मृती प्रित्यर्थ 1 मे रोजी अ.भा.छावा संघटनेतर्फे भव्य रोग निदान शिबीराचे आयोजन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  26 Apr 2022, 5:33 PM
   

अकोला   : स्व. डॉ. गोविंद मोरे यांचे स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२२ रोजी अ.भा. छावा संघटनेतर्फे सांगळूद येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत जि.प.केन्द्रीय शाळेत भव्य रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
        ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे. त्यांच्या पर्यंतही शहरातील डॉक्टरांची सेवा पोहोचली पाहिजे. या उदात्त हेतूने सदर शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शिबीराचे आयोजक तथा अ. भा. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत काळे पाटील यांनी दिली आहे. शिबीराचे उद्घाटन डॉ. दीपक मोरे यांचे हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभय पाटील, सौ. वंदनाताई मोरे उपस्थित राहतील. 
सदर शिबीरात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे, डॉ. अनंत शेवाळे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमोल रावणकार, डॉ. नरेन्द्र सरोदे, डॉ. प्रणय महल्ले, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. सचिन गाडेकर, डॉ. ऐश्वर्या पारडकर, दंतरोग तज्ज्ञ डॉ. योगेश साहू, डॉ. अमर भुईभार, बाल शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. भुपेश पारडकर, बालरोग तज्ञ डॉ. निलेश दायमा, डॉ. नितीन गायकवाड, छातीरोग तज्ञ डॉ. प्रदीक मेंडे, चर्मरोग तज्ञ डॉ. सागर टाले, कान नाक घसा तज्ञ डॉ. विजय खेरडे, डॉ. शेखर खोंडे, मेडीसन तज्ञ डॉ. स्वप्नील लाहोळे, शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. पुरूषोत्तम तायडे, डॉ. मिलींद चौखंडे, मानस रोग तज्ञ डॉ. सुजय पाटील, पोटविकार तज्ञ डॉ. शिवाजी ठाकरे आदी प्रख्यात डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करतील व त्यांना औषधी सुद्धा उपलब्ध करून देतील. 
१४ मे रोजी छत्रपती संभाजी राजे यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने अ. भा. छावा संघटनेतर्फे सदर रोग निदान शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला १४ मे रोजी भव्य अशा मोटर सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष रणजीत काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक सभा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रामुख्याने अ. भा. छावा संघटनेचे योगेश गोतमारे, बाळुभाऊ वानखडे, अनंतराव बगाडे, मनीष वाडीवाले, महेन्द्र भगत, राजु शहा, ज्ञानेश्वर गावंडे, पंकज कौलखेडे, योगेश विजयकर, सचिन नागापुरे, शिवाजी अरबट, शुभम धनवर, अक्षय नागापुरे, शंतनु गोरले, चेतन म्हसने, कल्पेश कांबे, आदेश इंगळे, अभिजीत मंगळे, गोपाल चिपडे, अंकुरकार, पवन गवार, महादेव मोरे, अभिषेक देंडवे, गोलु तायडे, राजेश बिल्लेवार, प्रविण शिंदे, निलेश इंगळे, महादेव तायडे, पवन मोरे, पवन पागृत, नारायण उमाळे, शिवम भालतिलक, दिपक अढाव, उत्तम काडे, किशोर आखरे, मनोहर शहा, गणेश जाधव, शुभम काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Post Views:  304


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व