प्रभातच्या साना, शर्वरीची विभागस्तर लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Nov 2022, 6:47 PM
   

अकोला: प्रभात किड्स स्कूलच्या दोन खेळाडू साना संजय खडसे आणि शर्वरी राजीव गरकल यांनी जिल्हास्तरीय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट  यश प्राप्त केले असून त्यांची १४ वर्षाआतील मुलींच्या गटाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
       क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्थानिक ऑफिसर्स क्लब येथे शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.
      या स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या गटात इय्यता आठवीतील साना खडसे व इय्यता सातवीतील  शर्वरी गरकल यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक पटकाविला. दोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धंसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांच्यासह शिक्षकवृंद तथा कर्मचाऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे  कौतुक केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


    Post Views:  201


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व