पंचशिल मंडळाचे वतीने डॉ. स्वाती पडघन व डॉ. सतीष पडघन सन्मानित
पंचशिल बौद्ध विहारास स्टिलच्या दरवाजाचे दान
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
12 Apr 2023, 6:27 PM
अकोला : जठारपेठेतील सुप्रसिद्ध आर्थोपेडीक डॉ. सतीष पडघन व त्यांची पत्नी डॉ. स्वाती पडघन या समाजसेवी दाम्पत्याने न्यू महसूल कॉलनीतील पंचशिल बुद्ध विहाराला भेट दिली. व विहाराचे सुरु असलेल्या कामाला विहाराला तीस हजार रुपयाचा स्टीलचा दरवाजा दानाचे स्वरुपात भेट दिला. यावेळी पंचशिल मंडळातर्पेâ डॉ. स्वाती पडघन व डॉ. सतीष पडघन यांना पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष से.नि. तहसीलदार आत्माराम तेलगोटे, उपाध्यक्ष से.नि. ए.एस.आय. वासुदेवराव चक्रनारायण, कर्तव्यदक्ष कोषाध्यक्ष से.नि. मंडळ अधिकारी ज्ञानदेव खंडारे, से.नि. मुख्याध्यापक रामकुमार खंडारे, से.नि. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक ओरा चक्रे सर, अॅड. विजय वानखडे, दादाराव वाहुरवाघ, सौ. सरदारताई, सौ. वाहुरवाघ ताई, अॅड. एकनाथ चक्रनारायण, ़कारागिर भाटीया, साहित्यिक तथा पत्रकार पंजाबराव वर आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर दाम्पत्यांनी विहार बघून आनंद व्यक्त केला व त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतूक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडारे गुरुजी यांनी तसेच संचालन पंजाबराव वर यांनी तर आभार ओरा चक्रे सर यांनी मानले.
Post Views: 234