शेतकरी सहकार पॅनल तेल्हारा तर्फे रुग्णसेवक, युवा वक्ते सौरभ वाघोडे यांचा सन्मान!
शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य खोटरे यांनी केले कौतुक
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
06 Dec 2022, 7:33 PM
अकोला - तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथील रुग्णसेवक, महाराष्ट्राचा युवा महावक्ता सौरभ गणेशराव वाघोडे हा युवक श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने अत्यंत कमी वयात व कालावधीत रुग्णसेवेचा वसा घेतला आहे. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यामुळे तालुक्याचे नावलौकिक होत असल्याचे गौरवोद्गार सदस्य सुरेश खोटरे यांनी काढले. सौरभ वाघोडे यांना कोणतीही मदत लागल्यास शिक्षण संस्था त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे सुरेश खोटरे म्हणाले. ते तेल्हारा तालुक्यातील शेतकरी सहकार पॅनलच्या वतीने तालुका मेळावा स्थानिक भागवत मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या मेळाव्यामध्ये तेल्हारा तालुकाभूषण रुग्णसेवक सौरभ गणेशराव वाघोडे यांचा सत्कार करण्यात आला. पंचगव्हाण गावातून शेतकरी कुटुंबातील मुलगा व्याख्यानांच्या माध्यमातून तालुक्याचे नावलौकिक वाढवत आहे. त्याच्या पाठीशी कौतुकाची सोहळा पार पडला.
ठेवण्यासाठी थाप त्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे व शेतकरी पॅनलचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब बिहाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराष्ट्राचा महावक्ता तथा रुग्णसेवक सौरभ वाघोडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी प्रहाराचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे होते, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशदादा खोटरे,शेतकरी पॅनलचे अध्यक्ष प्रा.सुधाकर येवले,डॉ.अशोक बिहाडे,प्रकाशसिंह मलीये,किसनदादा घोंगे,अशोक दारोकर,प्रा प्रदीप ढोले,शंकरराव ताथोड,अरविंद अवताडे,श्याम भोपळे,रमेश ताथोड,अनुप मार्के,अजय पा.गावंडे,अरविंद अवताडे,प्रा.संजय हिवराळे,अफरोज खान,प्रकाश वाकोडे,दामोदर मार्के,जनार्दन चतारे,अनिल अग्रवाल,अशोक राठी,मनोहर यादगिरे,दादा पाटील मोहोड,विक्रांत शिंदे,ऍड.पवन शर्मा,अरविंद तीव्हाणे,पुरुषोत्तम गावंडे,बाळासाहेब निमकर्डे,गोपाल विखे,महेंद्र गोयंका,रामाभाऊ फाटकर,राजेश भीमराव खारोडे,मनीष भांबुरकर,नथमल शर्मा,राजेश वानखडे,भवानी प्रताप,निलेश धनभर या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता अनुप मार्के,विवेक खारोडे,रवी बिहाडे,अजय पा.गावंडे,डॉ.ज्ञानेश्वर तराळे,श्याम ढाकरे,प्रमोद गावंडे,कुलदीप तराळे,श्याम घोंगे,विपीन देशमुख,अनंत मानखैर,ज्ञानेश्वर मार्के,राजेश पाचपोर,अक्षय साबळे यांच्यासह तेल्हारा तालुक्यातील शेतकरी सहकार पॅनलचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Connection failed: Operation not permitted