जुने शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिर परिसरात N. M. C. कार्ड शिबिराचे यशस्वी आयोजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Jul 2026, 2:56 PM
   

अकोला : जुने शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिर परिसरात रविवार दि. १२ जुलै रोजी आर एस एस च्या श्री काळामारोती व्यवसायी शाखेतर्फे राज्य परिवहन महामंडळाचे सवलतीचे N. M. C. कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा १४६ महिला व पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
       शिबिराला महानगर सेवाप्रमुख श्री विलासजी जोशी, अकोला जिल्हा घुमंतु प्रमुख श्री आनंदजी उगले यांची विशेष उपस्थिती लाभली.  तसेच शाखेचे स्वयंसेवक श्री प्रकाशजी महागावकर, श्री वासुदेवरावजी मोरे, श्री सुनिलजी खोत, श्री अनिलजी दिपके, श्री उदयजी गंगाखेडकर, श्री संजयजी गंगाखेडकर, श्री नरेंद्रजी परचुरे,  श्री प्रसादजी परचुरे व श्री मनिष पाथरकर यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
         स्वयंसेवक संघ अकोला महानगर श्री काळामारोती व्यवसायी (प्रभात) शाखेतर्फे श्री काळामारोती मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री जागेश्वर मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री सितलामाता मंदिर तसेच अगरवेस परिसरातील नागरिकांसाठी NMC कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वय वर्ष ६५ चे वरील सर्व पुरुष तसेच परिसरातील सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व