न्यु इरा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी ५४ वर्षानंतर दिला स्मृतीला उजाळा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
26 Dec 2022, 5:43 PM
अकोला - येथील न्यु इरा हायस्कुलच्या १९६८ वर्षांच्या १० वी मॅट्रीकच्या बॅचची एकत्रीत बैठक (Batchmate Gathering) दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. चौपन वर्षांनंतर आपल्या वर्गमित्रांना, मैत्रीणींना भेटून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. बालपणानंतर आता वयाच्या सत्तरीत भेटल्यानंतर सर्वांना गहीवरुन आले. यापैकी फारच थोडे एवढे वर्षात अधुन मधुन भेटत असत पण बहुसंख्य ५४ वर्षानंतर एकमेकांना याच प्रसंगी भेटले. दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जैन लॉन येथे सर्व एकत्र होऊन, सर्वप्रथम सर्वांची एकमेकांशी पुन्हा नव्याने ओळख करुन देण्यात आली. शाळेतील वर्गात ४२ विद्यार्थी १९६८ ला होते त्या ९ जणांना दुर्दैवाने देवाज्ञा झाली, त्यांना श्रध्दांजली देण्यात आली. त्या नंतर प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या व स्मृतींना उजाळा दिला.
या नंतर न्युइरा हायस्कुल येथे सर्वांनी जाऊन शाळेची भेट घेतली व शाळेतील स्मृती जागृत केल्या. शाळा प्रशासनाचे अध्यक्ष श्री. मोहन गद्रे, सदस्य श्री. जयंत मराठे, श्री. घड्याळजी यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व शाळेची प्रार्थनाचे गायन केले. मुख्याध्यापक श्री. ठोके सर यांनी शाळेबद्दल माहिती सांगून शिक्षण क्षेत्रातील चढाओळीमुळे शाळा चालवण्यात येणाऱ्या अडथळ्यांचे विवेचन केले. रवी भालेराव व श्रीकृष्ण दिक्षीत व गणेश सांगळोदकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. शाळा प्रशासनाचे अध्यक्ष श्री. मोहन गद्रे यांनी शाळेबद्दल विस्तृत माहिती देऊन माजी विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. शाळेतील वर्ग ५ ते १० पर्यंत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन शाळा भेटीची सांगता झाली.
दुपारच्या सत्रात सर्वांनी जैन लॉन येथे एकत्रीत येऊन आपआपला १० वी नंतरच्या शैक्षणिक व वैयक्तीक जिवनाचा प्रवास विषद केला. सायंकाळी अकोल्याची सुप्रसिध्द लीटल चॅम्प गायीका कु. श्रुती भांडे हिच्या गायनाचा कार्यक्रम रात्री १० पर्यंत झाला. आपल्या गायनाने श्रुतीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी अनेकांनी आपले गायन कौशल्य क कविता वाचन केले. दुसऱ्या दिवशी सर्वांनी एकत्रीत शेगांवला जाऊन गजानन महाराजांचे आशिर्वाद घेतले. मोमेंटो व ग्रुप फोटोचे सर्वांना वाटप केल्यानंतर व
आभार प्रदर्शन नंतर माजी विद्यार्थ्यांच्या गॅदरींगचा समारोप झाला. या प्रसंगी डॉ. चारु जैन (माहुरकर), रवी भालेराव, श्रीकृष्ण दिक्षीत, रवी घाटे, ओमप्रकाश शर्मा, हेमंत बोडस, दत्ता जाधव, डॉ. राम बडे, गणेश सांगळोदकर, विजय शहा, उदय कपले, अशोक अनासने, दिपक देशपांडे, हे सर्व माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ५४ वर्षापूर्वीच्या माजी मीत्र / मैत्रीणींना शोधण्यासाठी न्युइरा शाळा प्रशासनाने फार मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोला येथे स्थाइक असलेल्यांनी सहकार्य केले. या प्रसंगी माजी विद्यार्थीनी सौ. उषा कौंडण्य (पात्रीकर) ह्या उपस्थित होऊ शकल्या नाहीत, परंतु त्यांनी आपल्या भावना खालील कवीतेत व्यक्त केल्या.
असे आमच्या वर्गमित्र मैत्रिणीचे गेट-टुगेदर ।
होईल चर्चा जुन्या आठवणींचे तिथे सत्वर ||
शिक्षणापूर्वी सर्व होते विद्यार्थी दशेत ।
आज आपण भेटतो ते सर्व आहे प्रौढावस्थेत ।
अनेक चढ उतार पाहिले प्रत्येकाने मधल्या काळात ।
तेही आपण स्वीकारले आनंदात ।।
आता ओढा ठेवु या ईश्वरचरणाकडे धर्माने ।
जीवनाचे शेवटचे चरण अनुभवु या आनंदाने ॥
सौ. उषा कौंडण्य (पात्रीकर ) यांनी संपूर्ण कुटुंबासह धार्मिक कार्याला
आयुष्य अर्पण केले आहे.
Post Views: 302