५०० महिलांची फौज उभारणार्‍या रणरागीणी अहिल्यादेवी विजयकुमार गडलिंगे यांचे जयंती दिनी प्रतिपादन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Jun 2025, 8:27 AM
   

अकोला : ५०० महिलांची फौज उभारणार्‍या रणरागिणी प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ठरतात, पैशाचा उपयोग गोरगरीबांच्या कल्याणासाठी करणार्‍या खर्‍या अर्थाने त्या पुण्यश्लोक असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व मानवाधिकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार गडलिंगे यांनी मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालय न्यु महसुल कॉलनी अकोला तर्पेâ ३१ मे जयंती दिनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि. पोलीस अधिकारी वासुदेवराव चक्रनारायण होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पंचशिल मंडळाचे कर्तव्यदक्ष कोषाध्यक्ष ज्ञानदेव खंडारे गुरुजी, से.नि. मुख्याध्यापक रामकुमार खंडारे, से.नि. अधिकारी सुभाष इंगळे, आदर्श शिक्षक ओरा चक्रे सर होते.
यावेळी वासुदेवराव चक्रनारायण, ओरा चक्रे सर यांनी अहिल्या देवी होळखर यांच्या जीववर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला  वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव वर, दिनेश सोनोने, मंगेश झिने, वाचनालयाचे कोषाध्यक्षा सुनंदा पं. वर, मनिषा भुजाडे, मिनाक्षी शेगोकार, विद्या अंभोरे, सार्थक, उत्कर्ष, ईश्वरी, समृद्धी, अजिंक्य, कु. अनूजा सोनोने आदिची उपस्थिती होती. ़कार्यक्रमाचे संचालन संस्थाध्यक्ष पंजाबराव वर, आभार प्रदर्शन सुभाष इंगळे यांनी केले. मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    Post Views:  42


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व