अकोला पत्रकार तथा लोकस्वातंत्र्य सभासदांच्या विद्यार्थी पाल्ल्यांचा गुणगौरव समारंभ
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून २० जूनपर्यंत प्रस्ताव निमंत्रीत!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
10 Jun 2026, 7:22 PM
अकोला - गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक आणि गौरवातून प्रोत्साहनाने प्रगतीसाठी प्रेरणा देण्याचा लोकस्वातंत्र्य महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा एक दरवर्षाचा नियमित उपक्रम आहे.या अनुषंगाने याही वर्षी अकोल्यातील सर्व पत्रकार,लोकस्वातंत्र्य सभासद पत्रकार व विचारमंथन परिवारातील सभासदांच्या अग्रेसर गुणाक्रमाने यश संपादन केलेल्या १० व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे पत्रकार महासंघाच्या ५८ व्या नियमित मासिक विचारमंथन मेळाव्यात रविवार दि.२८ जून २०२६ रोजी आयोजन करण्यात येत आहे.तरी सर्व पत्रकार आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार व विचारमंथन सभासदांनी आपल्या पाल्यांची नावे या समारंभासाठी नोंदवावीत.
यासाठी १० वी १२ वी मध्ये ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणानुक्रमाने उत्तिर्ण झालेले अकोला शहरातील किंवा जवळपासचे विद्यार्थ्यी यासाठी पात्र राहतील.विद्यार्थ्यांनी आपली मार्कलिस्ट,एक पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबरसह संपूर्ण पत्त्याचा तपशिल सोबत जोडावा. पत्रकार पाल्य असल्यास वडीलांचा पत्रकारितेचा प्रिन्ट किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा आय कार्ड किंवा कोणताही अधिकृत प्रमाणित पुरावा व आधारकार्ड सोबत असावे.या संपूर्ण माहितीसह आपले प्रस्ताव पोस्टाने/कुरिअरने " संजय एम.देशमुख,संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ सहयोग प्रिन्टर्स,चव्हाण कॉम्प्लेक्स, मनमंदिर कापड दुकानाच्या बाजूला,गणपती सोनोग्राफी,लहरिया यांच्या नवीन कॉम्प्लेक्समोर,भागवत प्लॉट,तापडीया नगर,अकोला,४४४००५ (मोबा.क्र. 82085 99427 / 9881304546) या पत्त्यावर दि.२० जून २०२६ पर्यंत पाठवावेत.व्हाटस् अॕपवर पाठविलेले व दि.२० नंतर मिळालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत.याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.असे आवाहन अध्यक्ष संजय देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख,प्रा.डॉ.संतोषजी हुशे अंबादास तल्हार,पुष्पराज गावंडे,सौ.जया भारती,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,सागर लोडम व पत्रकार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post Views: 79