अमरावती : बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादनाच्या कामाला गती
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विकासासोबत व्यवसायाला गती देण्यासाठी साकार होत आहे. हायस्पीड बुलेट ट्रेनचा मार्ग अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून जाणार आहे. ही हायस्पीड बुलेट रेल्वे जिल्ह्यातून 74 किलोमीटर धावणार असून भूसंपादनाच्या कामाला गती देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे काही वर्षांत नागरिकांना हायस्पीड रेल्वेचा अनुभव घेता येणार आहे.
अमरावतीवासीयांनी आतापर्यंत एसटी बस, रेल्वे, विमान प्रवासाचा अनुभव घेतला असला तरी काही वर्षांत त्यांना परदेशांप्रमाणे हायस्पीड रेल्वेचा अनुभव घेता येणार आहे. यासंदर्भात 22 नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली. यामध्ये भूसंपादनासाठी तोडगा काढण्याबाबतही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे कामकाज सुरू आहे.
हेही वाचा: राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन; गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई
या प्रकल्पासाठी अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता याचप्रकारे मार्गापासून जवळच असलेल्या नांदगाव खंडेश्वर, धामणगावरेल्वे आणि चांदूररेल्वे या तालुक्यातील 43 गावांच्या हद्दीतून हायस्पीड रेल्वे धावणार असून रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी 43 गावांमध्ये 397 भूखंडाचे काम करण्यात येणार आहे.
हायस्पीड रेल्वेला मिळणार दोन थांबे128.77 भूखंड संपादित करण्यात येणार आहे. यासंदर्भात 43 गावांतील सरपंचांसोबत तहसीलदारांमार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे. या संस्थेची नियुक्ती जीपीएस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडतर्फे करण्यात आली आहे. मुंबई ते नागपूर, अशी एकूण 12 स्थानके यात असतील. ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दोन स्थानकांचा समावेश असणार आहे.
Post Views: 313