भावानुबंध समूहाचे ऑनलाइन काव्यसंमेलन जल्लोषात संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Jun 2022, 7:13 PM
   

नवकवीच्या  काव्य गुणांना वाव मिळावा, म्हणून भावानुबंध साहित्य मंचाच्या समूह प्रकाशिका अनिता देशमुख सरदार यांनी गुगल मीटवर ऑनलाइन काव्यसंमेलन दिनांक 19 6 2022 रोजी आयोजित केले होते. हे संमेलन मोठ्या प्रमाणात जल्लोषात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मानवता मानवी विचारांचे गीत - हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे या गीताने समूह प्रकाशिका अनिता देशमुख यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका व आदर्श शिक्षिका अनेक सन्मान पुरस्कृत सन्माननीय लीलाताई पुजारी डोहळे ह्या लाभल्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालिका, कवयित्री ,शिक्षिका, पत्रकार सौ आशाताई ब्राह्मणे यांनी केले.  सुरुवातीला अनिता देशमुख यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस हार अर्पण  करून, त्यांना नमन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली . सूत्रसंचालिका आशाताई ब्राम्हणे यांनी सुंदर चारोळ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यांना सोबत म्हणून छाया पायमोडे यांनीही सूत्र संचालन केले. आशा ताई यांनी कार्यक्रमात  वेगवेगळ्या चारोळ्या ,शेर  सादर करून वेगळीच रंगत आणली. एकूण 28 कवियत्री यांनी आपल्या स्वलिखित कविता सादर केल्या त्यांचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. भरभरून दाद मिळत होती.

प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री कराटे, चॅम्पियन, नृत्यांगना ,प्रसिद्ध मॉडेल ,सन्माननीय रुपाली पवार लाभल्या , त्यांनी ऑनलाईन संमेलनाचे महत्व सांगितले .ऑनलाइन संमेलन ही झालीच पाहिजे घरी बसून सादरीकरण करता येते. आज टेक्नॉलॉजी चा फायदा घेऊन सर्वांनी असे कार्यक्रम आयोजित करावे त्यांना खूप आनंद झाला.
दुसऱ्या प्रमुख पाहुण्या मुंबई महानगर पालिकेतील आदर्श शिक्षिका उत्तम निवेदिका सन्माननीय भारतीताई नाईक यांनी स्वीकारले यांनी आपल्या वक्तव्यातून काव्य म्हणजे काय ? कवितेचा अर्थ बाळा जो जो रे अंगाई गीता पासून ते अनेक काव्य प्रकारांच्या माहिती दिली .
 काही कवयित्री त्यांनी हिंदीतील प्रेम काव्य सादर केलेले अत्यंत हास्य हसू येईल असे काव्य होते .  त्यांच्या आठवणींना काव्यातून कसा उजाळा मिळेल हे सादरीकरण केले . मुलगी सासरला जाताना तिची पाठवणी करताना वडिलांची काय अवस्था होते . हे काव्यातून सादर केले प्रेमाच्या नावाखाली वाजवी आणि अन्याय कसा होतो ? कसा प्रेमाला कलंक लावला जातो अशा नराधमांना स्त्रीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना कसा धडा द्यावा  हे असे आपल्या रचनेतून दर्शवले. काही कविता प्रेमाच्या हिंदोळ्यावर कसे जगावे, कसे नवे पंख मिळावे, आयुष्याला हे दर्शविले .
 काहींच्या  रचनेत भाबड वय कसे धोक्याचे वळण घेते.याबाबत वयामध्ये गरिबीचे चटके  ,अनुभव नसतात ह्या गोष्टी अवगत नसतात, हे काहींच्या रचनेतून सादर करण्यात आले. त्यामध्ये कन्यादान, बाप, आई निसर्गचक्र पर्यावरणाचे महत्त्व, मुलीचा जन्म, नारी जन्म अशा रचनांनी कंठ दाटून आला. 
भावनांचा आक्रोश ,संदेश रचनेतून जाणवला वंशाचा दिवा मुलगाच नसून मुलगी होऊ शकते . अशा विविध प्रकारच्या रचना सर्व श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून गेल्या भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. अनिता देशमुख यांच्या शालेय शिक्षिका सौ भोपळे ताई यांनी मुलीचा जन्म झीड कारू नये, माता पित्याना कसे महत्त्व देते , मुलगी कशी गौरव  करू शकते , त्यांचा कसा आधार होऊ शकते हे दर्शवले.  प्रेमासाठी कधी गुलजार तर कधी रफी होते अभ्यासापेक्षा प्रेमास प्रत्येक जण कसा यलगार होतो हेही त्यांनी दर्शवले. अध्यक्षपदी असणाऱ्या लीलाताई यांनी शब्दांच्या भावना कवी कसा  मांडतो, माझ्या शब्दांचे अर्थ शोधू लागले , नकळत शब्दांना धार चढत गेली, अंतरीचे उसासे अशा प्रकारचे गजलेचे शेर सादर करून कवी समाजाचा घटक आणि कसा प्रतिबिंब असतो हे अध्यक्षीय भाषणातून सांगितले .
एकंदरीत २८ कवयित्रीचा बहरदार, रंगतदार भावस्पर्शी, हृदयस्पर्शी रचनांचा एक आगळा-वेगळा ऑनलाइन कवी संमेलनाचा सोहळा पार पडला. समूह प्रशासक आणि अयोजिका अनिता देशमुख यांनी आपल्या सर्व सख्यांचे, पाहुण्यांचे अध्यक्षांचे,सूत्रसंचालक या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

    Post Views:  232


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व