जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरेवाडी (नायफड) भीमाशंकरच्या पायथ्याशी, आदिवासी क्षेत्रातील विजयकुमार शेटे यांना आंबेगाव भूषण 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी सायं 8.00 वाजता घोडेगाव येथे युग प्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या शिक्षण,कला, उद्योग, क्रीडा, वैद्यकीय, पत्रकारिता, आरोग्य, आदर्श सरपंच, सहकार, विधीतज्ञ व महिला बचत गट आदी क्षेत्रात काम करणाऱ्या 44 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णु(काका) हिंगे पाटील अध्यक्ष पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ, विवेक वळसे पाटील मा.उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे, पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील संचालिका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई, कैलासबुवा काळे मा. सभापती पंचायत समिती आंबेगाव, नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती सोमनाथ काळे, रत्नाताई गाडे,प्रमुख अतिथी अजय मोरे (भा.प्र.से) अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे, संस्थेचे संस्थापक गौतमराव खरात अध्यक्ष विठ्ठल टिंगरे स्वागत अध्यक्ष गौतमराव रोकडे कार्याध्यक्ष संतोष देठे कोषाध्यक्ष दयानंद मोरे सरचिटणीस जितेंद्र गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
शालेय दैनंदिन विविध उपक्रम साजरे केले जातात. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे . जीवन अनुभव देणारी शाळा प्रत्यक्ष शिक्षणावर भर दिला जातो विविध सण जयंती उत्सव साजरी केली जातात शालेय सुविधांना मिळवण्यावर शाळा शंभर टक्के आहे.शाळा डिजिटल केलेली आहे.रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर,मुंबई माता बाल संगोपन,जानकी देवी बजाज या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शाळेस पुरवले आहे. आंबेगाव भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय नाईकडे शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड मनपा,जीवनजी कोकणे गटशिक्षणाधिकारी खेड, नंदा पवार,ज्योती चिलेकर, अशोक गोडसे, सुनंदा शेवकरी, बेबी दरेकर व भारती उबाळे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव दराडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय ठोकळ समस्त ग्रामस्थ व पालक यांनी शेटे यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
Post Views: 391