निनाद वायकोळे ह्यांना डॉक्टरेट इन बिजनेस मॅनेजमेंट ऑनर मिळाल्याबद्दल सन्मान


 संजय देशमुख  10 Jan 2024, 7:26 PM
   


पुणे-निगडी येथे राहणारे डॉ.निनाद वायकोळे यांना वयाच्या ३९ वर्षी डॉक्टरेट इन बिजनेस मॅनेजमेंट लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार समारंभ सोहळा ६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, निगडी येथे पार पडला.

ह्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड व पुणे येथील सर्व लेवा पाटीदार मंडळांचे अध्यक्ष व उच्च पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री. माणिभाई मानवसेवा ट्रस्ट अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंगसेवक ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे प्रामुख्याने उपस्थित होते. 

व्यासपीठावरील उपस्थित डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. दिनेश नेहेते, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ.सौ.रेखा भोळे, श्री. सिताराम राणे, श्री. निना खर्चे, श्री. नितीन बोंडे, श्री. विकास वारके, श्री. पुरुषोत्तम पिंपळे , आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. निनाद वायकोळे यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ओम गगनगिरी वर्डवाईज फौंडेशन च्या अध्यक्षा व संस्थापक डॉ.सौ.रेखा भोळे यांच्या तर्फे सुद्धा डॉ.निनाद वायकोळे यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्र संचालन श्री. रवींद्र बऱ्हाटे यांनी केली तसेच डॉ.निनाद वायकोळे यांची प्रोफाईल श्री.अमोल अष्टपुत्रे यांनी सुंदर शब्दात लोकांसमोर मांडली.

सर्व मान्यवरांनी डॉ.निनाद वायकोळे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, अंतरराष्ट्रयीय कार्या बद्दल माहिती देऊन त्यांचे भरपूर कौतुक केले व त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.

या प्रसंगी डॉ. निनाद वायकोळे यांचे मित्र परिवार, समस्त वायकोळे परिवारातील सदस्य व समाज बंधू आणि भगिनी हे मोठ्या संख्येने आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

डॉ. रवींद्र भोळे यांच्या मनोगतात त्यांनी डॉ. निनाद वायकोळे हे समाजातील तरुण नेतृत्व असून त्यांनी एवढ्या तरुण वयात समाजासाठीचे केलेले योगदान व समाज प्रगती साठी केलेल्या परिश्रमाबद्धल त्याचे कौतुक केले व  त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. निनाद वायकोळे यांच्या मनोगतात त्यांनी समाजासाठी केलेले कार्य तसेच त्यांना वरिष्ठ लोकांकडून मिळालेले सहकार्य बद्दल त्यांचे आभार मानले. आपल्या परिवाराच्या आणि सर्व लेवा पाटीदार समाज बंधू भगिनी व त्यांचे बालमित्र परिवार यांच्याच आशीर्वादाने त्यांना ही ऊर्जा मिळाली ह्याचा देखील यांनी उल्लेख केला व सर्वांचे मनापासून आभार मानले. *समाजसेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे* अशा उच्च विचारांने व निस्वार्थपणे समाज सेवा करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे नाव आज मिळवल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले . याप्रसंगी समाजातील अनेक मान्यवर डॉ. एल झेड पाटील, कृष्णाजी खडसे अनेक मान्यवर उपस्थित होते.

    Post Views:  142


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व