फिलीपाईन्समधील वैद्यकीय अभ्यासक्रमात अकोल्याच्या अतुल देशमुख चे नेत्रदिपक यश
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
29 Jan 2025, 10:24 AM
अकोला - अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय श्रीधरराव देशमुख, नायगावकर (स्वातंत्र्य संग्राम सैनिक), यांचा नातू अतुल शरदराव देशमुख हा फिलिपाईन्स या देशातून AMA lnstitute of Medical Studies (एम बी बी एस )ला प्रथम दहा मध्ये उत्तीर्ण झाला असून त्याने भारतातील F M G C Delhi ही परीक्षा सुद्धा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.एका भारतीय विद्यार्थ्याने वैद्यकिय अभ्यासक्रमात प्रदेशात प्राप्त केलेले उच्चांकाचे यश हा देशासोबतच समाजाचा आणि विशेषत: देशमुख समाजाही गौरव आहे.त्याबद्दल डॉ.अतुल शरदराव देशमुख याचे सर्वत्र कौतुकासह अभिनंदन होत आहे .
Post Views: 79