सुरज पाटील यांच्याकडून गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप


 संजय देशमुख  07 Dec 2021, 8:56 PM
   

दौंड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा दौंड शहराध्यक्ष व राजे प्रतिष्ठान कामगार सेना युवक पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरज विजय सिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप केले आहे.
त्यांनी सध्या च्या वातावरणात कडक्याची थंडी पडत आहे यात एक उपयुक्त आणि आदर्श कार्यक्रम हाती घेतला आहे. वाढदिवसाचा इतर खर्च टाळून त्यांनी गरजू लोकांच्या मदती साठी हात पुढे केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवसेना युवा नेते अमोल दादा जगताप ,  सिद्धेश प्रसाद कदम आणि मित्रपरिवार हे देखील उपस्थित होते.

    Post Views:  342


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व