निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने लालबाग राजाचे स्वागत


 विश्वप्रभात  2024-09-04
   

अकोला - एडवोकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी मूर्तिकार शिवा मोकळकार यांच्या येथे नवसाला पावणारा लालबाग राजाच्या गणेशाची महाआरती व पूजा करून भाविकांचे स्वागत करण्यात आले. बुधवारी माळीपुरा एकता गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते लालबाग राजाच्या गणेश मूर्तीला आणायला जठार पेठेतील ज्योती नगर येथे आले होते. यावेळी मंडळाच्या भाविकांना व वारकऱ्यांना निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच दुपारी चार वाजता मूर्ती सिद्धीविनायक गणेश मंदिराजवळ आल्यावर निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी लालबाग राजाची महाआरती करून व श्रीफळ अर्पण करून पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी सिद्धिविनायक गणेश मंदिराचे विश्वस्त निनाद आठवले, प्रभाकर दोड प्रामुख्याने उपस्थित होते.

    Post Views:  51


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व