आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबिराचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
28 Aug 2024, 12:28 PM
परभणी : परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथील नव्याने सुरू झालेल्या बालाजी आयुर्वेदिक औषधालय व निसर्गोपचार आणि योग केंद्राचे उद्घाटन आज परभणीचे जिल्हाधिकारी मा.रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मदन लांडगे, बंडू पाचलींग, शिवसेना विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, शिवलिंगअप्पा खापरे कुणबी ज्येष्ठ नेते नारायण चट्टे,पत्रकार शेख इफ्तेखार, पत्रकार प्रभू दीपके,सांगोला चे सतीशचंद्र गुळमिरे, अरुण मराठे ,अँड पवन निकम, नितीन महाराज गोगलगावकर,डॉ.शंकर डूब्बेवार, डॉ.काजी मोहम्मद,डॉ. सय्यद जाहेद आली,शिवचरण बिडकर,कृष्णा कटारे,सूर्यकांत मोगल, एम.आर गोरे सर,एम.आर आकाश कुलकर्णी,एम.आर ओम सागर,एम आर संगई सर,नारायण चट्टे,अशोक घाटेकर,संभाजी शेवटे,गोविंद महाराज पोंडे गुरुजी,अंबादास वाकोडे,बालाजी आयुर्वेदिक केंद्राचे मुख्य संचालक डॉ.गोविंद कामटे आंदीची उपस्थिती होती. आज उद्घाटन निमित्त मोफत आरोग्य शिबीर ही घेण्यात आले.ज्या मध्ये गुडघेदुखी, कमरेचे आजार, सांधे-दुखी,जुनाट सर्दी, मुळव्याध, मुतखडा,कोड(सफेद डाग) हाता- पायाला मुंग्या येणे यासह अन्य व्याधी वर सविस्तर मार्गदर्शन करून आलेल्या 108 रुग्णाच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. प्रास्ताविक डॉक्टर गोविंद कामटे त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संभाजी शेवटे बहुसंख्य रुग्णालय मित्र रुग्णसेवक उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आरोग्य सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली
Post Views: 34