वानखेड ते वरवट बकाल रोडच्या कामावर बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!


जिल्हा प्रतिनिधी स्वप्निल देशमुख
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Apr 2024, 3:31 PM
   

 वानखेड : वानखेड ते वरवट बकाल  ग्रा.मा.क्र. ९७ या रस्त्याच्या सुरू असलेल्या  कामावर वान नदीपात्रातून अवैधरित्या रेती मिक्स रुडी वापरण्यात येत असल्याने  या ररत्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. मात्र सदर काम सुरू असतांना नदीपात्रामधून अवैध उत्खनन करून रेतीसह रूढी वापरल्यामुळे सदरील काम बोगस व नित्कृष्ट दर्जाचे होत असून त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण व अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी व नागरिक तसेच वाहनधारकांनी केली आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याला टक्केवारीचे ग्रहण लागलेले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वानखेड गावातील नेत्यांचे देखील तिकडे दुर्लक्ष आहे.त्यामुळे जनतेच्या पैशातून अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे रस्ते होत असतांना गावातील पुढारी जर गप्प बसत असतील तर विकासाच्या दृष्टीने ही फार मोठी शोकांतिका असल्याची चर्चा सुरू आहे. शासन कोट्यावधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामावर खर्च करीत असतांना रस्ते वर्षभर नाही तर सहा महिनेही टिकतील की, नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.नियमानुसार कोणतेच मटेरियल वापरले जात नाही.नागरिकांनी  तक्रार केली असता लक्ष दिले जात नाही.त्यामुळे या कामात वरिष्ठांचे हितसंबंध असल्याने याविषयी ब्र शब्द काढायला तयार नसल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे.यावरुन अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, हिच रोजगार हमी या म्हणीचा प्रत्यय देणारे तर हे काम नाही ना? अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. सदरच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे. निकृष्ट दर्जाचे काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी हे शासनाच्या पैशाची लूटमार होतांना गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.काॅंट्रॅंक्टर व संबंधित बांधकाम विभागाचे मधूर संबंध असल्यानेच या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असावे. या रस्त्याच्या कामाची चौकशी होणे तर आवश्यक आहेच त्याचबरोबर या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणे त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असल्याचे गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे.
चौकट-
कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरुन त्यांच्याकडून तात्काळ कार्यवाही बाबत तहसीलदार यांना पत्र देण्यात आले. त्यावरून वानखेड ते वरवट बकाल या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर वान नदीपात्रातून अवैद्य १५० ब्रास रुडी टाकल्याचा पंचनामा करून अहवाल  तलाठी वानखेड व मंडळ अधिकारी पातुर्डा यांनी तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे सादर केला. यावरून स्पष्ट होते की, सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.त्यामुळे तात्काळ काम थांबवून मंजूर इस्टिमेट प्रमाणे काम करण्यात यावे तसेच शासनाची फसवणूक करत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांच्याकडे केली आहे.
माधव उर्फ स्वप्निल देशमुख
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ  बुलढाणा जिल्हा अध्यक्ष

    Post Views:  108


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व