डॉ. कश्मिरा संखे हिचा बोईसरमध्ये भव्य नागरी सत्कार


 संजय एम. देशमुख  29 Jun 2023, 10:07 PM
   

 बोईसर - नागरी सेवा परीक्षा (UPSC) परीक्षेत डॉक्टर कश्मीरा संखे ही देशात २५ वा नंबर तर महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान मिळवणारी वंजारी समाजात प्रशासकीय सेवा ( IAS) होणाऱ्या पहिल्या महीला आहेत.


      डॉ.कश्मिरा संखे हिने भारतीय प्रशासकीय सेवा (IAS ) परीक्षेत नेत्र दीपक कामगिरी केल्या बद्दल आज तिची बोईसर स्टेशन पासून, वंजारी समाज हॉल नवापूर रोड पर्यंत ढोल ताशा ,लेझीम च्या गजरात मानवंदना देऊन तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली.


    कश्मिराने नेत्रदीपक यश संपादन करून भारतीय प्रशासकीय सेवा(IAS) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होतअसतानाच आज वंजारी हितवर्धक मंडळ, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ, सोमवंशी क्षत्रिय मंडळ, बारी समाज, आदिवासी समाज व इतर समाजाच्या मंडळातील पदाधिकारी यांनी आज वंजारी समाज हॉल नवापूर नाका बोईसर येथे भव्य नागरी सत्कार करुन तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
     ह्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ह्यांच्या उपस्थितीत पार पडला असुन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ह्यांची प्रमुख उपस्थितीत लाभली होती.

     सत्कार मूर्ती डॉ्. कश्मिरा संखे ह्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडील यांना देऊन त्यांनी युवा पिढी व पालक वर्ग यांना खूप मुलांचे मार्गदर्शन केले . त्या आपल्या मोलाच्या मार्गदर्शन भाषणात IAS अधिकारी किरण बेदी व IPS अधिकारी विलास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज हे मी यशाचे शिखर पार केले. हे यशाचे शिखर पार करताना मी दोन वेळेस परीक्षेमध्ये अपयशी ठरली, परंतु जिद्द न सोडता , अपयश ही यशाची पहिली पायरी आहे . हे लक्षात ठेवून मी तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाली.
      हा भव्य नागरी सत्कार पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष नरोत्तम पाटील, उपाध्यक्ष निलम संखे ,सचिव खजिनदार , कमिटीचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी मोठ्या सहकार्याने आयोजित केला होता.
     ह्या कार्यक्रमाकरिता पंचक्रोशीतील विविध समाजातील पदाधिकारी, महिला वर्ग युवा पिढी, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  215


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted