शिवसेना ठाकरे गटाचा युवा अधिकारी विजय प्रसाद सह, एम. के. अन्सारी ,दुर्गेश पाठक, विकास सिंग व प्रमोद तिवारी ह्यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यामध्ये खंडणी व इतर गुन्हे दाखल
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
28 Aug 2023, 11:13 AM
बोईसर ( संतोष घरत) - दि. ३० जुलै २०२३ रोजी मे. सडेकर इनवायरो इंजीनियरींग लिमीटेड या कंपनीच्या गोडाऊन मध्ये स्टोरेज करण्यात आलेले हाय सीओडी इटीपी वॉटर हे मे. सडेकर इनवायरो इंजीनियरीगं लिमीटेड यांच्या भूखंड क्रमांक इ. १३३ या कंपनीत आणून सोडत असताना यतीन पिंपळे ह्याचा वाहन चालक व मालकीचा टैंकर क्र. MH-06/AQ-4164 हा कंपनी मध्ये नेत असताना अडवुन शिवसेना ठाकरे गटाचा युवा अधिकारी विजय प्रसाद आणि अन्य ३ जणांनी काही एक कारण नसताना, यतीन पिंपळे यांच्या मालकीचा वरील नमुद क्रमाकांच्या टँकर जवळ येऊन टँकरच्या व्हॉल मध्ये मालकाच्या परवानगीविना, खोडसाळपणा करीत ड्रायव्हरला गाडीच्या कॅबीनमधुन खाली उतरविले. गाडीचे विनापरवानगी व्हिडीओ शुटींग करून टैंकर मध्ये घातक व बेकायदेशीर माल डप करण्यासाठी आणला आहे.या मालाची गळती होत असल्याने सदरचे मॅटर मिटवण्यासाठी र २ लाख रुपयांची मागणी केली. असे यतीन पिंपळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे .
तसेच दुस-या दिवशी ३१ जुलै रोजी सकाळी ११:००वाजता बोईसर पोलीस ठाण्यात टैंकर सोडण्या संदर्भात यतीन पिंपळे हे विचारणा करण्यास गेले असता तेथे त्याला पत्रकार प्रमोद तिवारी भेटला व सांगू लागला की. तुझे उनलोगोने बोला थाना, वहाँपेही सेंटलमेंट कर दे, अभी देख तु, तेरी गाड़ी कैसी छूटती है!मे देखता हूँ, तेरी गाडी यहाँपेही सड़ाता हूँ, मेरी पोहोच उपरतक है ,अब भी २ लाख रुपया देता होंगा तो तेरी सेटेलमेंन्ट करवा दूंगा ! नही तो भोग! असे बोलून निघून गेला, असे यतीन पिंपळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केले आहे .
म्हणुन तक्रारदार यतीन पिंपळे ह्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवा नवनिर्वाचित युवा अधिकारी शहर समन्वयक १)विजय प्रसाद, पत्रकार २) एम.के. अन्सारी, ३) दुर्गेश पाठक ४) विकास सिंह, विजय प्रसाद, ५) प्रमोद तिवारी यांच्याविरुदध्द कायदेशीर तक्रार केली.
विजय प्रसाद ह्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बोईसर मध्ये पक्षाची बाजू मजबूत करण्याकरिता बोईसर शहर समन्वय पदाची जबाबदारी दिली . जबाबदारी दिल्यानंतर लगेचच त्याच्यावर खंडणीसहित अनेक कलम बोईसर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेआहेत.
तक्रारदार यतीन पिंपळे ह्यांनी आज दि.२७/०८/२०२३ रोजी केलेल्या तक्रारीनंतर बोईसर पोलीस ठाण्या मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बोईसर शहर युवा समन्वय १)विजय प्रसाद,२) पत्रकार एम. के. अन्सारी ,३) दुर्गेश पाठक,४) विकास सिंह व ५)प्रमोद तिवारी यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३८४,३४१, ४२७,५०४, ५०६ व ३४ दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस अधिकारी धनराज शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Post Views: 357