सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Apr 2026, 1:43 PM
   

वाशिम - वाशीम येथील श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षेसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एडवोकेट राधा नरवलीया यांनी महिला सुरक्षा ही एक मोठे संवेदनशील कार्य असून  यावर शक्य तितके जास्त बोलले पाहिजे.महिलाही कणखर आहेत, या देशात तिची पूजा केली जाते. ती आई आहे, बहीण आहे. तरीही ती सुरक्षित नाही. 
      अजूनही अशी काही ठिकाणं आहेत की,त्याठीकाणी महिला स्वतःला सक्षम समजतात पण सुरक्षित नाहीत. शिक्षण दिल्याने सुशिक्षित महिला स्वतःच्या तसेच इतर महिलांच्या हक्कासाठी लढू शकतात.महिलांसाठी केवळ कायदे पुरेसे नसून समाजाची मानसिकता बदलणे आणि  महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे तथा  कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महिला सुरक्षित राहण्यासाठी काळाची गरज काय हे जर पाहिले तर सुरक्षित वातावरण. जोपर्यंत स्त्री सुरक्षित नाही तोपर्यंत समाजाचा विकास होऊ शकत नाही. कायद्यापेक्षाही जास्त गरज आहे ती पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची. 
     स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सन्मान जनक असला पाहिजे. स्वसंरक्षणासाठी आजच्या काळात प्रत्येक मुलीने व महिलेने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण पूर्ण करणे,म्हणजेच कराटे शिकणे आवश्यक आहे.सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी या सर्व गोष्टी माहिती करून घेतल्या तर आपण आपल्याकडून समाजातील महिलांना होणारा त्रासा नक्कीच कमी करू शकतो. असे अॕड.राधानरवालीया यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर भारती देशमुख या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी पानझडे यांनी केले.आभार प्रदर्शन तेजश्री नेहूल यांनी केले.महिला तक्रार समितीद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरीता सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व