पोलिस ठाण्याच्या वतीने वाहतूक शिस्तीचे व अपघात टाळण्याचे उपक्रम राबवावेत
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Dec 2024, 9:20 AM
(वैभव हराळ) जिल्हा प्रतिनिधी
श्रीगोंदा ---श्रीगोंदा पोलिस स्टेशन व आर टी ओ यांनी ट्रॅक्टर ड्रायव्हर व वाहन मालकांसाठी महत्वपूर्ण पावले उचलली पाहिजेत.ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी,ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रक व इतर साधनांवर वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबविणे, रात्रीचा वेळी होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालण्याचे प्रयत्न करणे,वाहतूक सुरक्षेतेचा मुख्य अडथळा ट्रॅक्टर मधील टेप मुळे होणारे कर्कश आवाज शा आवाजामुळे होतो. इतर वाहन चालकांना हॉर्न ऐकू येत नसल्याने अपघात घडतात.या समस्येवर तोडगा काढण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या वतीने वाहन चालकांवर आणि ठरा वर्षा खालील युवकांवर कारवाई करण्यात यावी. श्रीगोंदा पोलिस स्टेशन प्रमुख यांनी या संदर्भात काहीतरी उपाय योजना करावी. दिवसेंदिवस दौंड जामखेड हायवे वरती होत असलेल्या अपघातांना प्रतिबंध घालता येईल यासाठी वाहतुक शिस्तीच्या उपाययोजना करण्यात याव्यात. अशी मागणी अँटी करपशिअन ब्युरो इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप सोनावणे मनसे जिल्हा सचिव संजय शेळके, अतुल कोठारी, वैभव हराळ यांनी केली आहे.
Post Views: 95