हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!


या माहितीपटाचे उद्या समाजमाध्यमांवरून थेट प्रसारण
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Sep 2022, 8:56 AM
   

मुंबई, दि. १६ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!’ या माहितीपटाचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून १७ सप्टेंबरला सायं. ५ वाजता होणार आहे. 
या माहितीपटाचे थेट प्रसारण पुढील पुढील लिंकवरुन पाहता येणार आहे.
यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सवी शुभारंभ उद्या, दि. १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे प्रसारण होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखन अजित दळवी, विषयतज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे आणि निवेदन विनय आपटे यांचे आहे.
हा माहितीपट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एक वर्ष आणि एक महिना आणि २ दिवसाने उशिराने मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाड्याच्या सहभागाची तेजस्वी कहाणी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण दक्षिण भारतातल्या हैद्राबाद संस्थानातील काळरात्र संपली नव्हती. हैद्राबादचा तत्कालीन निजाम मीर उस्मान अली याने भारतात सामील न होता आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याच्या इराद्याने येथील जनतेवर अत्याचार आणि मुस्कटदाबीचे षडयंत्र आरंभले होते. निजामाच्या या जुलूमशाहीचे काटेरी तख्त उधळून लावण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची चित्ररुपाने देण्यात आली आहे.

    Post Views:  147


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व