पोलिस बदल्यांची यादी परबांकडून; अनिल देशमुखांचा धक्कादायक खुलासा


 संजय देशमुख  02 Feb 2022, 8:07 PM
   

मुंबई : राज्यातील पोलिस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे, असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
अतिरिक्त  मुख्य सचिव (गृह) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले होते. सीताराम कुंटेंचा जबाब अनिल देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानले जात होते. आता अनिल देशमुख यांनी अनिल परब यांचे नाव घेऊन प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 
ईडीने केलेल्या तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एका कॅबिनेट मंत्र्याने बदल्यांची यादी दिली होती असे नमूद केले. त्यावर अनिल देशमुखांना विचारण्यात आले असता त्यांनी उघडपणे अनिल परब यांचे नाव घेतले आहे. मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती, असे अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केले आहे. 
बदल्यांसंदर्भातील यादी गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी. पण, जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावे बाहेर काढा, असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते, असे स्पष्टीकरण देखील अनिल देशमुख यांनी जबाबात दिले आहे. 
परब यादी कुठून आणायचे?
अनिल परब पोलिस बदल्यांची यादी कुठून आणायचे असे ईडीने विचारले असताना अनिल देशमुखांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. कदाचित अनिल परब शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे. आमदार त्यांच्या आवडत्या अधिकार्‍यांची नावे अनिल परब यांच्याकडे द्यायचे आणि परब ती यादी तयार करून माझ्याकडे द्यायचे, असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे. 

    Post Views:  260


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व