समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे ह्याना चंद्रशेखर आजाद बेस्ट सोशल अवार्डने गौरविण्यात आले
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
05 Jul 2022, 11:45 AM
पुणे : डॉ मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर तसेच समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरंतर , निरपेक्षपणे निष्काम कर्म करणारे जेष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे ह्याना चंद्रशेखर आजाद बेस्ट सोशल अवार्डने गौरविण्यात आले. गोल्डन केअर क्लब बेंगलोर ह्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या एन जी ओ च्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉक्टर डे च्या निमित्ताने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
डॉ रविन्द्र भोळे हे डॉ रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने गोर गरीब, उस तोड मजुर तसेच वैद्यकीय सेवा घेण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना ,तसेच अपंग,मूकबधिर ,मतिमंद रुग्णांना नाममात्र फी घेउन धर्मदाय स्वरूपाची वैद्यकीय सेवा गेली तिस वर्षपासून देत आहेत.ते विविध संस्थाचे संस्थापक असून उरुळी कांचन वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सामाजिक , धार्मिक वैद्यकीय ,अपंग ,नैसर्गिक आपत्ती क्षेत्रातील महाराष्ट्रातील नामवंत कार्यकर्ते आणि प्रवचनकार आहेत.
या प्राप्त बहूमानाबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तथा हवेली तालूका महानुभाव परिषद अध्यक्ष नंदकुमार मुरकुटे, पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे सचिव रंगनाथ कड, पुणे जिल्हा जेष्ठ नागरीक सेलचे उपाध्यक्ष बाळकृष्ण काकडे सर, पत्रकार अमोल भोसले यांनी डॉ रवींद्र भोळे यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Post Views: 183