पाहा १ जानेवारी २०२२ पासून काय महागलं, काय झालं स्वस्त


किती पडणार खिशावर भार, कोणते होणार बदल
 संजय देशमुख  01 Jan 2022, 12:35 PM
   

आजपासून नवीन वर्ष (New Year 2022) सुरूवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसणार आहे. १ जानेवारी २०२२ पासून सर्वांच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. दरम्यान, आजपासून एटीएममधून पैसे (ATM cash transaction) काढण्यासह अनेक गोष्टी महाग होत आहेत. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas cylinder) स्वस्त झाला आहे.

बँक ग्राहकांना एटीएममधून कॅश ट्रान्झॅक्शन (ATM cash withdrawal limit per transaction) साठी यापूर्वी जेवढं शुल्क आकारलं जात होतं, त्यापेक्षा अधिक शुल्क आता द्यावं लागणार आहे. १ जानेवारी पासून ग्राहकांना एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिट पार केल्यानंतर अधिक शुल्क भरावं लागेल. रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार आता एटीएममधून लिमिटपेक्षा अधिक ट्रान्झॅक्शन केल्यास २१ रुपये + जीएसटी द्यावा लागणार आहे.

डेबिट कार्डाशी संबंधित नियम फायद्याचा
डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित एक नियम आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. या अंतर्गत, व्यापारी वेबसाइट किंवा अॅप यापुढे ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट दरम्यान तुमच्या कार्डचे तपशील संग्रहित करू शकणार नाहीत. पूर्वी साठवलेली माहिती हटविली जाईल.

पैसे काढताच शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या खातेधारकांना एका मर्यादेपासून रोख रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. आयपीपीबीमध्ये तीन प्रकारची बचत खाती उघडता येतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला चार वेळा पैसे काढता येतात. मात्र यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर किमान २५ रुपये द्यावे लागतील.

जेवणावर जीएसटी...

१ जानेवारीपासून स्विगी आणि झोमॅटो सारखे ई-कॉम स्टार्टअप त्यांच्या सेवांवर जीएसटी आकारतील. त्यांना आता अशा सेवेचे चलन सरकारकडे जमा करावे लागणार आहे. तथापि, यामुळे अंतिम खर्चावर म्हणजेच तुमच्या खिशावर जास्त भार पडणार नाही. सध्या रेस्टॉरंट हाच कर घेत आहे. सरकारने हे पाऊल उचलले कारण गेल्या २ वर्षांत फूड डिलिव्हरी अॅप्सने २००० कोटींची खराब कामगिरी दाखवली होती. असे केल्याने करसंकलन वाढेल, असे सरकारला वाटते. याशिवाय ओला, उबरसाठीही जीएसटी लागू होणार आहे. कंपन्यांद्वारे पुरवल्या जाणार्‍या सेवेवरही ५ टक्के GST लागू होईल. ऑटोरिक्षा चालक ऑफलाईन पद्धतीने सेवा देत असल्यास, त्यावर जीएसटी लागू होणार नाही.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याचे नियम
१ जानेवारीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची पद्धत बदलणार आहे. ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियम बदलले आहेत. आता ऑनलाइन पेमेंट करताना, तुम्हाला १६ अंकी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह कार्डचे संपूर्ण तपशील भरावे लागतील. म्हणजेच, आता व्यापारी वेबसाइट किंवा अॅप ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट दरम्यान तुमच्या कार्डचे तपशील संग्रहित करू शकत नाहीत. पूर्वी जतन केलेली सर्व माहिती हटविली जाईल.

    Post Views:  280


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व