भ्रातृ मंडळ अकोला तर्फे कुलगुरू प्रा. डॉ. विलास खर्चे यांचा सत्कार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, चे माजी मृदा शास्त्रज्ञ व संशोधन संचालक डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांची राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरू पदी महामहीम राज्यपाल यांनी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचा शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी भ्रातृ मंडळ, अकोला या सामाजिक संस्थेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच कृषि क्षेत्रात खूप भरीव कार्य करण्याची इछ्या व्यक्त करून शेतकऱ्यांना फायदा होईल अस्या पिकांच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकशित करण्यावर भर देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम.एन.पाटील होते. तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती कुलगुरू डॉ विलास काशिनाथ खर्चे, प्रमुख पाहुणे म्हणून कृषि अभियांत्रिकी शाखेचे सेवानिवृत्त अधिष्ठाता श्री एन.एन.नारखेडे , भ्रातृ मंडळ, मोताळा चे अध्यक्ष व महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे सचिव श्री दिलीपभाऊ नाफडे , तसेच भ्रातृ मंडळ अकोलाचे उपाध्यक्ष श्री राजीव इंगळे व श्री सोमा खर्चे हे होते.
याप्रसंगी सेवा निवृत्त अधिष्ठाता श्री एन एन नारखेडे यांच्या शुभहस्ते कुलगुरू डॉ. विलास काशिनाथ खर्चे यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देवून सत्कार करून त्यांना शुभेछ्या देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एम एन पाटील यांनी डॉ विलास खर्चे यांच्या सेवाकाळात कृषि संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाचा उल्लेख करून आता कुलगुरू म्हणून ते कृषि संशोधनात शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली. यावेळी दिलीपभाऊ नाफडे यांनी समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला समाजातील प्रतिष्ठित समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रा. महेन्द्रकुमार चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन सौ मिनाक्षी फिरके यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव श्री श्रीकृष्ण नारखेडे यांनी केले.
Post Views: 14