पालघर : लाचखोर वनरक्षक अखेर एसीबीच्या जाळ्यात


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Jun 2022, 9:38 AM
   

(श्री. संतोष घरत)  पालघर : लाजखोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवदास सोनवणे(कासा, नर्सरी) या वनरक्षकाला अखेर पालघर एसीबीने लाच घेताना अटक केली आहे. पिंपळशेत कार्यक्षेत्रातील एका गावातील ग्रामस्थाला वन पट्ट्या खाली वाटप केलेल्या जागेत बांधबंदिस्ती करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून वनरक्षक शिवदास सोनवणे यांची भेट घेतली. त्यानंतर सदर वन पट्ट्या जागेवर मी  बांधबंदिस्ती साठी कुठलीही परवानगी देणार नाही असे त्यांनी सदर ग्रामस्थांला सांगितले. त्यानंतर पुन्हा भेट घेऊन यातून मार्ग काढत लाचखोर शिवदास याने  दहा हजाराची तक्रार दाराकडून लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने सरळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या  तक्रारीवरून पडताळणी केली असता वनपट्टावरील  बांधबंदिस्ती साठी शिवदास सोनवणे यांनी दहा हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले त्यावरून पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यात आरोपीने स्वता पैसे न घेता एका खाजगी इसमास पैसे घेण्यास सांगितले व काही तासातच हा सापळा यशस्वी ठरला. खाजगी इसमाला  पंचासमक्ष दहा हजार रुपये घेताना कासा पोलीस स्टेशन समोरील भाजी दुकानात रंगेहात पकडले. यात खाजगी इसमाला सुद्धा शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पोलिस निरीक्षक
स्वपन बिश्वास, पोहवा/संजय सुतार,अमित चव्हाण,विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, पोना/दिपक सुमडा,स्वाती तारवी, सखाराम दोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर
दुरध्वनी   02525-297297
पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप 
मो.नं. 9923346810/ 9850158810
 पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास 
 मो.नं. 8007290944/ 9405722011
@ टोल फ्रि क्रं. 1064

    Post Views:  770


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व