आमदार किरण सरनाईक यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन... हार्दिक शुभेच्छा...


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Sep 2022, 8:44 AM
   

शिक्षण, शेती, ग्रामीण भागाची नाळ जुळलेला,गोरगरिबाची जाण असलेला जाणते आमदार मा. किरणभाऊ सरनाईक अमरावती विभागीय शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार एडवोकेट किरण आप्पासाहेब सरनाईक यांचा आज 14/ सप्टेंबर ला वाढदिवस त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा... त्यांच्या प्रभावी कार्याचा थोडक्यात लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले किरण सरनाईक शेती माती शिक्षण गोरगरीब सर्वसामान्य साठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे. आमदार झाले तरी सर्वसामान्यांसी नाळ त्यांनी जोडून ठेवली आहे. सर्वधर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. राजकारण नव्हे तर समाजकार्य करणारे धडपळे व्यक्ती म्हणून ते अकोला वाशीम जिल्ह्यात सुपरिचित आहेत.आधी समाजकारण 90 टक्के नंतर  राजकारण 10 टक्के करणाचे धोरण ठेवले.  भाऊ यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आपल्या शाळा-महाविद्यालयात सुद्धा गोरगरीब सर्वसामान्य असा सर्व  जातीच्या धर्माच्या लोकांना नोकरीत प्राधान्य दिले. एवढेच नव्हे तर ओपन जागेमध्ये राखीव व्यक्तीला प्राधान्य देऊन आपण दिलेला शब्द पाळण्यासाठी ते  कटिबद्ध  राहिले. कामाला महत्त्व देणारे किरण भाऊ यांनी अकोला येथील समाजकार्य महाविद्यालय अचानक भेट दिली असता तिथे काम करीत असलेला  एक व्यक्ती कॉलेजमध्ये कोणी नसतानाही आपले इमानदारीने काम करीत असल्याचे त्यांना दिसल्यावर त्या व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करून त्याला कॉलेज वर  सुद्धा लावून घेतले. अशाप्रकारे गोरगरिबांची व काम करणाऱ्या माणसाची कदर करणारे कामातच राम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे किरण भाऊ. सुरुवात पासून काँग्रेस विचाराची एक नीस्ट  असलेले किरण भाऊ यांनी आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही.काँग्रेस पक्षात काम करीत असताना अनेक वेळा पद मिळाली अनेक वेळा मिळाली सुद्धा नाही तरी त्यांनी काँग्रेस पक्ष सोबतची बांधिलकी कायम ठेवत ती विचार  धारा  सोडली नाही. भाऊ चे वैशिष्ट्य म्हणजे दुसरे शरद पावर म्हणावे लागेल एकदा एखाद्या व्यक्तीचे नाव विचारले की तो व्यक्ती दहा वर्षांनी मिळाला तरी त्याला नावासगट आवाज देऊन आस्थेने विचारपूस करणारे व्यक्तिमत्व होय. माझा व त्यांचा परिचय  रिसोड येथील ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे यांच्या जाहीर सभेचा कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला होता. अण्णा च्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते आमचे रिसोड तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सरनाईक व अरविंद देशमुख यांनी त्यांना  कार्यक्रमला  बोलावले होते. त्या माध्यमातून त्यांचा परीचेय व संपर्क वाढत गेला. त्यानंतर मध्ये खूप मोठा गॅप पडल्यानंतर सुद्धा त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला नावानिशी हाक दिली त्या कार्यक्रमात मि कोणता ड्रेस घातला आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. या वरून  किती आठवणीचे पक्के आहेत हे दिसून आले. आमचे मित्र सखा डॉक्टर कृष्णकांत वक्टे प्राध्यापक किशोर वाहने  यांच्याकडून त्यांच्या अनेक गोष्टी व त्यांच्या बद्दलची माहिती मला मिळाली आहे. समाजसेवा, शिक्षण, राजकारण, क्रीडा,साहित्य संस्कृती व शेतीमध्ये  रस असलेले धडपडे व्यक्तिमत्व  म्हणजे किरण   सरनाईक. आमदार मालतीबाई सरनाईक ह्या आमदार असल्यावर सुद्धा त्यांनी तरुणपणात आपल्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही जमिनीवर राहून लोकांमध्ये जाऊन काम करीत राहिले युवक काँग्रेसचे अकोला वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यावेळी  तरुणांची मोठी ताकद  त्यांनी पक्षासोबत जोडून घेतली होती. प्रत्येकाचा आदर करणे   ही त्यांची संस्कृती ती त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये त्याचा जिवलग असा मित्र परिवार त्यांनी निर्माण केला आहे तो टिकून ठेवून त्यांच्या संपर्कात सुद्धा आहे. पद आज आहे उद्या नाही आहे. परंतु माणूस म्हणून माणसासोबत माणसासारखे वागून त्याच्या कामात पडले पाहिजे हा त्यांचा संकल्प राहिला आहे. शिक्षक आमदार झाले तेव्हापासून त्यांनी कामाचा मोठ्या प्रमाणात झपाटा चालू केला आहे. कोणतेही काम तडीस जाण्यासाठी त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याचा संपूर्णपणे पाठलाग करून ते पूर्ण काम होईपर्यंत कधी स्वस्थ बसत नाही. व प्रशासनाला सुद्धा स्वस्त बसू देत नाही. शाळेचे अध्यक्ष म्हटले की सर्वसामान्य कर्मचारी त्याच्याविरोधात जास्त असतात परंतु मी पाहिलेल्या संस्थानिकांना पैकी किरण भाऊ सरनाईक यांना त्यांच्या शाळा महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या  मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असल्याचे मी त्यांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या दरम्यान पाहिले आहे . सर्व कर्मचारी तन-मन-धनाने स्व  इच्छेने  काम करीत असल्याचे मी डोळ्याने पाहिले आहे. नाहीतर इतर संस्था अध्यक्ष ना विरोध करणारा सर्वात मोठा वर्ग म्हणजे हा त्या संस्थेचे कर्मचारी असतो. परंतु किरण सरनाईक यांला अपवाद ठरले आहे. आपला आपुलकीच्या वागणुकीमुळे त्यांनी सर्वांचे प्रेम मिळवलेले आहे. एक कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क, मित्रवर्ग  असल्यामुळे त्यांना काम करण्यात कोणतीही अडचण येत नाही.अशा सर्वांना घेऊन चालणारे सर्वांशी नातेगोते जपणारे, काम करणारे कर्मयोगी व्यक्तिमत्व म्हणजे किरण भाऊ सरनाईक आहेत त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास लाख. ????????????????माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे,  काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातले एक तुम्ही,म्हणून भाऊ व्यक्तिमत्व आपका शान है हमारी, कर्तुत्व आपका पहचान है हमारी, हिफाजत करना है, जिंदग की क्युकी सासे आपकी जान है हमारी.....

शुभेच्छुक : गजानन ओंकार हरणे, खडकी अकोला
समाजसेवक, लेखक, कवी, साहित्यिक , वक्ता, समाज सुधारक तथा पत्रकार
9822942623

    Post Views:  725


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व