निंबीवासिय नागरीकांचा निवडणूकांवर बहिष्कार!


जोपर्यंत निंबीला जोडणारी पक्की सडक नाही,तोपर्यंत मतदान नाही!
 विश्वप्रभात  08 Dec 2025, 8:55 PM
   

अकोला : बाळापूर तालूक्यातील निंबा गावालगत असलेल्या निंबी येथील रस्ता अनेक वर्षात डांबरीकरण न केल्याने या बाबींचा निषेध म्हणून येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणूकांमधील मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहिर केले आहे.याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी राज्य निवडणूक आयोग, मुंबई , जिल्हाधिकारी ,अकोला जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक,उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी,व तहसिलदार बाळापूर यांचेकडे नुकतेच सादर केलेले आहे. 
    अकोला ते निंबा फाटा ते निंबा आणि जळगाव जामोद व पुढे मुक्ताईनगरकडे जाणारी ही मुख्य सडक आहे.या रस्त्यावरून निंबी या गावाला जोडलेला हा रस्ता फक्त २.५० कि.मी. आहे.परंतू स्वातंत्र्यानंतर एकदाही या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण झालेले नाही.कधी एक तर कधी अर्धा किं.मी.नित्कृष्ट काम करून गावकऱ्यांची बोळवण करण्यात आली.त्यानंतर त्याची कधीही डागडूजीही न झाल्याने त्याला प्रचंड खोल असे खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे या रोडवरील शेतातील माल घरापर्यंत नेण्यासाठी निंबा फाट्याकडील दररोजच्या प्रवासासाठी शेतकरी आणि नागरीकांना असंख्य अडचणींना तोंड देत फेऱ्या कराव्या लागतात.पावळ्यात या रस्त्यावरील खड्डे पाण्याने तूडूंब भरतात.त्यामुळे विद्यार्थी एक-दोन महिणे निंबा येथील शाळेत किंवा इतरत्र जाऊ शकत नाहीत‌.या रस्त्यावरून पायी चालणे पण मुश्कील असल्याने नागरीकांना अनेक हाल अपेष्टांंना तोंड द्यावे लागत आहे.हा रस्ता अकोला जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून त्यासाठी गावकऱ्यांनी वेगवेगळ्या पातळीवरून प्रयत्न केले.परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. म्हणून हतबल झाल्याने निंबी ग्रामवासियांनी एकत्र येत आता येणाऱ्या निवडणुकांमधील मतदानांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतलेला आहे.जोपर्यंत ही पक्की सडक होणार नाही,तोपर्यंत निंबी गावातील एकही मतदार निवडणुकीत मतदान करणार नाही.असा एकमुखी निर्णय राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा तथा तालूका पातळीवरील अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन कळविला आहे.
     या निवेदनावर एकनाथ भिवटे,बाळकृष्ण भिवटे,संदिप सगणे,तंटामुक्ती अध्यक्ष,राजाराम सगणे,सरपंच विशाल वानखडे,अशोक वानखडे, पंढरीनाथ भिवटे व असंख्य गावकऱ्यांच्या सह्या आहेत.

    Post Views:  14


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व