जिल्हा परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग;महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक


 संजय देशमुख  28 Dec 2021, 8:46 PM
   

अकोला- जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या रेकॉर्ड रूमला मंगळवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.आगीत जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाल्याची सूत्रांची माहिती असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनास्थळी मनपाच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. 
जिल्हा परिषदेचे रेकॉर्ड रूम ही जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून आहे. त्याबाजूला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या रेकॉर्ड रूमला सकाळी आग लागली. या आगीमध्ये रेकॉर्ड रूममधील रेकॉर्ड जळाले. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकते नाही. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले हिट. परंतु आग विझविण्यासाठी दलाच्या जवानांना घटनास्थळी जाता आले नाही. त्यांना या रेकॉर्ड रूम कडे जाण्याचे प्रवेश द्वार दिसले नाही. त्यामुळे त्यांनी भिंतीवरून उड्या मारून आग विझविली. तीन पेक्षा जास्त बम्ब आग विझविण्यासाठी लागले.
तीन महिन्यात दुसऱ्यांदा जळाले जि.प चे रेकॉर्ड
गत १५ सप्टेंबर रोजी माध्यमिक शिक्षण विभागाच्या रेकॉर्ड रूमला आग लागून महत्त्वाची कागदपत्रे पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना ताजी असतांना आज परत जिल्हा परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग लागली असल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी याबाबत किती गंभीर आहेत हे दिसून येते.

    Post Views:  230


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व