छत्रपती शिवरायांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा
पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीने दुमदुमली अकोला नगरी
संजय म. देशमुख
2023-06-06
अकोला- सार्वजनिक शिवराज्याभिषेक पालखी सोहळा समिती अकोला चे वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक जवाहर नगर चौकातील संभाजी पार्क येथून उमरी परिसरातील अश्वारूढ पुतळ्यापर्यंत हजारो नागरिकांचा सहभाग असलेली शिवरायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली .

प्रारंभी जवाहर नगर चौकात प्रामुख्याने उपस्थित असलेले मान्यवर आमदार अमोल मिटकरी, झेड. पी. अध्यक्ष संगीता ताई अढाऊ, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी आमदार बबराव चौधरी. पी. के. वी चे कुलसचिव प्राध्यापक संजय खडसे, जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष अशोकराव अमानकर, शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे,जनाधार फाउंडेशन चे अध्यक्ष अविनाश देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपालराव दातकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आश्विन नवले,NAB चे जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे, छावा चे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे, डॉ. रणजित कोरडे, गंगाधर ढोरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पटोकर, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, राज्याध्यक्ष विनायकराव पवार यांच्या सह महादेवराव भुईभार, बळीराम कपले, विजय कौसल, चंद्रशेखर पांडे, प्रकाश तायडे, डॉ. आर. बी. हेडा, डॉ. अशोकराव ओळंबे, विजय मलोकार, सुनील जानोरकर, निलेश देव, विजय बोरकर, राम मुळे, सुरेश गाढे पाटील, अविनाश नाकट, संदीप महल्ले, कपिल रावदेव, सुभाष म्हैसने,प्रशांत अवचार यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

आज सायंकाळी संभाजी पार्क येथून निघालेली शिवरायांची पालखी बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राऊतवाडी चौक ,लहान उमरी व येथून मोठ्या उमरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांपर्यंत नेण्यात येऊन तेथे पोवाडा व शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणांच्या कार्यक्रमानंतर सोहळ्यांची सांगता करण्यात आली. सदर पालखी मिरवणुकीत वारकरी, टाळकरी ,भजनी मंडळे ,ढोल ताशे, लहान बालकांचे लेझिम यांचा समावेश होता. या प्रसंगी पातूर येथील राघव निलेश गाडगे या लहान बालकाने तलवार व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली. याच कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर लिखित " छत्रपतींची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शिवराज्यभिषेकाचे माहात्म्य " या पुस्तकाचे तसेच संतोष झांबरे लिखित " शिव साहित्याच्या पाऊल खुणा " या पुस्तकांचे प्रकाशन आमदार अमोल मिटकरी व अतिथिंच्या हस्ते करण्यात आले.अतिशय आकर्षकपणे सजविण्यात आलेल्या या पालखीचे अनेक ठिकाणी स्वागत व पूजन करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी अनेक नागरिकांनी आपापल्या दुकाने तथा घरासमोर पाणी शिंपडून रांगोळ्या काढल्या होत्या. विविध सामाजिक मंडळांनी अनेक ठिकाणी पालखीतील नागरिकांसाठी पाणी व शरबतची व्यवस्था केली होती.
अकोला नगरीत शिवराज्याभिषेकाच्या पालखी सोहळ्याचा हा पहिलाच कार्यक्रम होता. या सोहळ्यात हजारो नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला हे विशेष. उमरी मधील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पूजनासोबतच पालखी मार्गात असलेल्या बारा ज्योतिर्लिंग मंदिर, लहान उमरी भागातील शिवरायांचा पुतळा, वीर भगतसिंग यांचा पुतळा यांनाही हार अर्पण करून पूजन करण्यात आले. सदर सोहळ्याच्या आयोजनाकरिता डॉ. विजय जाधव, सागर कावरे, सुरेश ठाकरे, प्रवीण काळे, विक्रांत काळे, राजेश मते, विनायकराव शेळके, राजेंद्र मोहोकर, प्रकाश चतरकर, डॉ. संजय धोत्रे, योगेश थोरात, अरविंद कपले, शरद ढगे, दयाराम मेतकर, ॲड. विलास वखरे, मनीष मोहोड, अनुप टाले, डॉ. एस पी ठाकरे, मधुकर देशमुख,पूजा काळे, सुषमा नीचळ, वंदना ताई मोरे, रेखा राऊत, इंदुताई देशमुख, संगीता आत्रम, सुषमा कावरे, रुपाली वाकोडे, साधना पाटील, आनंद सुकळीकर, पंकज देशमुख, आनंद वानखडे, विनोद नालट, अविनाश वसू, संतोष महल्ले, ॲड. संतोष गावंडे, राजेश मते, विठ्ठल गाडे, विजय चक्रे,सचिन गोमासे, संजय राऊत, प्रा. संजय देशमुख, श्रीकांत पागृत, गणेश कळसकर, दिनेश लोहोकार, प्रकाश सोनोणे, अजय पाटील, निशिकांत बडगे, संजय लुंगे, निलेश मते, राहुल कराळे,निखिल बोरीकर, योगेश पावित्रकर, राजेश राऊत यांच्या सह इतरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 166