पाटील समाज अकोलाचे वतीने भव्य वधू वर परिचय मेळावा संपन्न
672 उपवर मुला मुलींची नोंदणी
अकोला : पाटील समाज अकोलाचे वतीने आज स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात उपवर मुला मुलींचा परिचय मेळावा मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. आजच्या मेळाव्यात अकोला जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील सुद्धा एकूण 672 उपवर मुला मुलींची नोंदणी करण्यात आली. यात 402 मुले व 370 मुलींचा समावेश आहे. मेळाव्याचे प्रारंभी पाटील समाज अकोला चे अध्यक्ष अशोकराव अमानकर व इतरही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली बाहाकर, सचिव ऍड. दिपाली जानोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पसायदान सादर केले.
प्रारंभी पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याची गरज तसेच मराठा समाजाची दिशा व दशा यावर समयोचित मार्गदर्शन केले. अध्यक्ष अशोकरावअमानकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून मराठा समाजाच्या एकत्रीकरणाची गरज प्रतिपादित केली. समाजातील मुला मुलींची घटती संख्या यावरही त्यांनी चिंता व्यक्त करून फाजिल अपेक्षा न बाळगता योग्य वयातच मुला मुलींचे विवाह करा असा मौलिक सल्ला दिला. संमेलनास उपस्थित असलेल्या उपवर मुला मुलींनी उपस्थितांसमोर आपला परिचय सादर केला. ज्यांची मुले मुली या मेळाव्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या पालकांनी परिचय पत्रांचे वाचन केले. मेळावा करिता प्रामुख्याने प्राचार्य सुभाषराव भडांगे, डॉ. सुभाष कोरपे, डॉ. गजानन नारे, जगदीश मुरूमकर, विनोद मापारी, मंगेश काळे, विठ्ठलराव सरप, पंकज साबळे, सुधाकर खुमकर, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, शंकरराव वाकोडे, पंकज जायले, नचिकेत चोपडे, सुरेश पाटील, योगिता पावसाळे, पद्माताई अहेरकर, सुनिता मेटांगे, गणेशराव पावसाळे, अनिता भालतीलक, ऍड. मोहनराव अहेरकर, शरद वानखडे, वसंत पोहरे यांचे सह इतरही मान्यवर उपस्थित होते.
पाटील समाज अकोला चे कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, उपाध्यक्ष विनायकराव शेळके, सुरेश गाढे पाटील, सहसचिव विजय बोरकर, अविनाश पाटील, पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली बाहाकर, सचिव ऍड. दिपाली जानोरकर,रवी पाटील अरबट, डॉ. दिलीप मानकर, अविनाश नाकट, गजानन इंगळे, ऍड. संतोष गावंडे, संजय लुंगे, संदीप महल्ले,गजानन हरणे, विठ्ठलराव गाढे, दिनकरराव सरप, देवेंद्र ताले, देवराव हागे पाटील, नमित भुईभार, सुधाकर वानखडे, निवृत्ती पारसकर, निलेश पवित्रकार, शैलेश काळे, घनश्याम दांदळे, रामभाऊ हलवणे, रामेश्वर सपकाळ, श्याम कुलट, विक्रम जानोरकर, गुणवंतराव जानोरकर, माणिकराव गावंडे, विनायकराव गावंडे, मधुकर महल्ले, सागर अमानकर, अतुल अमानकर, अर्चनाताई पाटील, संगीता दाळू, राधा राऊत, नलिनी राऊत, अनिता गावंडे, प्रमिला टाले, रेखा कुलट, सरिता वाकोडे, अनिता पाटील, सरिता मोहोकार व इतरही सदस्यांनी उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्यास सहकार्य केले. मेळाव्याचे प्रास्ताविक, संचलन, व आभार प्रदर्शन सचिव प्रदीप खाडे यांनी केले. परिचय पत्रांचे वाचन अविनाश नाकट व ऍड.संतोष गावंडे यांनी केले.
विश्वास कक्षाची स्थापना
संसारात काही अडचण निर्माण झाल्यास किंवा प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्यास त्यांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करण्यासाठी विश्वास कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा कार्यभार ऍड. दिपाली जानोरकर या बघणार आहेत. विशेष म्हणजे या मार्गदर्शनासाठी कोणतीही फी न घेता आपण विनामूल्य काम करू असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
विवाह जुळल्यास 25 हजार रुपयांचा पुरस्कार
या मेळाव्यात उपस्थित राहून आपला परिचय देणाऱ्या मुला मुलींचा विवाह जुळल्यास पाटील समाजातर्फे त्या जोडप्यास 25 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा याप्रसंगी करण्यात आली.
Post Views: 30