दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासह तीन दीवस सरावाने पिंजर येथील आपत्ती व्यवस्थापन अपडेट
मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व ब
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Jul 2024, 11:32 AM
दोन दीवस प्रशिक्षण आणी तीन दीवसाच्या सरावाने आता कोणत्याही आपात्कालीन परीस्थीतीशी दोन हात करण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक नवनवीन ॲक्टीविटीसह अपडेटसह स्वयंसेवक सज्ज
मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन पिंजर जिल्हा अकोला हे गेली 25 वर्ष झाली अकोला जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनासह शोध व बचाव कार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणी जणजागृती सह जिवनरक्षक सेवा,रुग्णवसेवा,रस्ते अपघातसेवा,प्राणीसेवा, सामाजिकसेवांसह ईतरही समाजपयोगी सेवा निस्वार्थपणे सेवा/सुरक्षा, व्यवस्था देत आले आहेत. उत्तराखंड,माळीण,सांगली,कोल्हापूर,पंढरपूर,येथे सहभागी होऊन शोध व बचाव कार्य केले.अशा आज पर्यंत विविध आपात्कालीन घटनांमध्ये तसेच रस्ते अपघात मधुन 6918 नागरिकांना जिवनदान दिले याच प्रमाणे 3629 वर मृतदेह शोधून बाहेर काढलेत याच निमित्ताने 25 वर्षाची यशस्वी सेवापुर्ती पुर्ण झाल्याचे औचित्य साधून 30 जुन ते 5 जुलै पर्यंत काटेपुर्णा डॅम वर आणी श्री क्षेत्र वाघागड हाॅलवर दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणी तीन दिवस सराव कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.यामधे आपत्ती व्यवस्थापनातील नविन अपडेट,स्विमिंग मेथड,रंगित तालीम,तसेच आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक संमेलन.आपत्ती व्यवस्थापन निवारणा संबंधित शोध व बचाव साहित्य गॅलरी प्रदर्शनीत शोध व बचाव साहित्यांची ओळख आणी त्यास हाताळण्याची पद्धती आणी मानवनिर्मित वा नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणा-या घटनांशी तसेच पुर परीस्थिती निर्माण झाल्यास त्यावर शोध व बचाव मोहीम राबविण्याची पद्दती,रोप क्लायमिंग,बिल्डींग डेमो,धरणात स्विमिंग मेथड,पुरात वाहून जाणा-या तसेच पाण्यात बुडणा-या व्यक्तीला वाचविण्याच्या पद्धती संबंधित कवायती धरणात करुन दाखविण्यात आल्या.सकाळच्या सत्रात प्रशिक्षण आणी दुपारी रंगीत तालीम नंतर समारोपीय सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन झाले या पाच दिवस समारोहाचे उद्घाटन 30 जुन रोजी पिंजर पो.स्टे.चे ठाणेदार गंगाधर दराडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय प्रतिनिधी गोपाल मुकुंदे साहेब,पाट बंधारे विभागाचे शाखा अभियंता इंगोले साहेब,पाठक साहेब,तसेच पत्रकार मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.एक जुलै रोजी तहसीलदार राज वजीरे साहेब उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव साहेब पुरवठा अधिकारी गुप्ता साहेब यांच्या उपस्थितीत काटेपूर्णा धरणात पुर परीस्थीतीत उद्भवणा-या आपात्कालीन घटनांमधून वाहुन जाणा-या तसेच पाण्यात बुडणा-या व्यक्तींना वाचविण्याच्या पद्धती आणी त्यावर प्रथमोपचार करण्याच्या पद्धतीचे सराव कवायती करुन दाखविण्यात आल्या या पाच दिवसाच्या कालावधीत पुर,आग, भुकंप,भुसख्खलन,रस्ते अपघात,प्रथमोपचार,शोध व बचाव कार्यवाही ही आयएसओ कार्य प्रणाली नुसार प्रशिक्षण देण्यात आले विषेशत या मधे टीम समन्वय,डीसीप्लीन,ISO कार्य प्रणाली पद्धती,चे खास प्रशिक्षण देण्यात आलेत.पथकात दाखल झालेल्या अत्याधुनिक शोध व बचाव साहित्यांची प्रदर्शनीचा डीसप्ले लावण्यात आला होता पथकात रिमोट ऑपरेटींग वाॅटर रेस्क्यु क्राफ्ट,दोन फायबर बोटी,स्कुबाडायविंग कीट,ऐअर लिप्टींग बॅग,सहा ईमरजंन्स सर्च लाईट सेटप, 20 लाईफरींग,20 लाईफ जॅकेट,साऊंड सेटप,ऐअर टेंट,ॲडव्हेंचर सेटप, ऑक्सिजन काॅन्सलेटर सेटप,सहा शिडी लिडर,वाॅकी टाॅकी सेटप,ईत्या.साहीत्यांसह अपडेट झाल्याने यामुळे आता नव्या जोमाने कोणत्याही आपात्कालीन घटनांमधे आमचे स्वयंसेवक पुर्ण ताकदीने काम करतील.पाच दिवसीय सरावात संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक पिंजर, पिंपळगाव चांभारे, मुर्तीजापुर मंगरूळपीर, आगर,महान,अकोला, येथुन मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते.विषेशत पथकात 15 मुलिंची रेस्क्यु टीम तयार करण्यात आली असून आपात्कालीन परिस्थितीत महीलांचे संरक्षण व सुरक्षा संदर्भात मुलींची टीम तयार करण्यात आली आहे.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
Post Views: 42